NEP 2025 : नमस्कार मित्रांनो,नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाविषयी महत्त्वपूर्ण अपडेट समोर आलेली असून त्यामध्ये मोठे बदल करण्यात आलेले आहेत.राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी 3 ते 8 या वयोगटात करण्यात येणार आहे.
मित्रांनो यावर्षीपासून इयत्ता पहिलीच्या पाठ्यपुस्तकाची छपाई सुरू करण्यात आलेली आहे असं राज्याचे शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रंजीतवाल यांनी स्पष्ट केले आहे टप्प्याटप्प्याने इयत्ता आठवी पर्यंत या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
National Education Policy
नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP 2020) उच्च शिक्षणात लागू झाल्यानंतर आता जून 2025 पासून नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी शाळा पातळीवर करणे संदर्भात पूर्वतयारी पूर्ण करण्यात आलेली आहे.
मित्रांनो पहिल्यांदा तीन ते आठ वयोगटातील म्हणजे बालवाडी शिष्यवर्ग पहिले आणि दुसरी या इयत्तेसाठी हा बदल लागू करण्यात येणार आहे सन 2028 पर्यंत जवळपास आठवीच्या येथे पर्यंत नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होणार आहे.
मित्रांनो एनएपी ची अंमलबजावणी पदवी अभ्यासक्रमासाठी 2003 24 सालापासूनच सुरू करण्यात आली होती त्यानंतर शालेय शिक्षणासाठी तयारी राज्याने केली होती आता दुसरा टप्पा सुरू होणार असून तीस ते आठ वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तके तयार करण्यात येणार आहे.
NEP 2025 New Update
एनसीईआरटीच्या धर्तीवर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने राज्य अभ्यासक्रम आराखडाही तयार केला. या आराखड्यानुसार शैक्षणिक क्षमता निश्चिती करण्यात आली असून त्यादृष्टीने आता पाठ्यपुस्तके तयार होत आहेत.
काय असतील बदल ?
मित्रांनो इयत्ता पाचवी पर्यंतचा अभ्यास क्रमांक चा विषय घेतला तर तिसरी ते पाचवीच्या इयत्तांचा अभ्यासक्रम बहुतेक सारखाच असणार आहे मात्र तिसऱ्या व्यक्तीपासून भारतीय ज्ञान प्रणाली हा विषय समाविष्ट केला जाईल.
इयत्ता सहावी ते आठवीच्या इयत्ता मध्ये राज्य अभ्यासक्रम आराखड्यातील शिफारशीनुसार इतिहास भूगोल नागरिकशास्त्र यांचा एकत्रित करून सामाजिक शास्त्रानुसार एक विषय तयार केला जाईल.
कला शिक्षण आणि व्यवसायपूर्व कौशल्ये (प्री-व्होकेशनल स्किल्स) शारीरिक आणि बौद्धिक विकासासाठी कलाशिक्षण व व्यवसाय शिक्षणाचा समावेश सहावी ते आठवीच्या अभ्यासक्रमात करण्यात येणार असून नवीन दहावीच्या विषयांमध्ये कला विषयाचा समावेश केला जाईल जवळपास नवी दहावीसाठी दहा विषयांचा समावेश असणार आहे.