Mutual fund : म्युच्युअल फंडांनी फेब्रुवारी महिन्यात केली ‘या’ 5 शेअर्समध्ये सर्वाधिक गुंतवणूक; पहा संपूर्ण यादी

Mutual fund : नमस्कार मित्रांनो, आपल्याला माहिती असेल की सध्या शेअर मार्केटमध्ये मोठा चढ-उतार पाहायला मिळत आहे. बऱ्याच गुंतवणूकदारांनी आपले पैसे काढून घेण्यावर भर दिला असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे.त्यामध्ये एसआयपी ला सुद्धा मोठा फटका बसलेला आहे.

मित्रांनो अशातच फेब्रुवारी महिन्यात म्युच्युअल फंडांनी कोणत्या शेअर्समध्ये सर्वाधिक गुंतवणूक केली आहे, याची माहिती समोर आलेली आहे.फेब्रुवारीमध्ये कोणत्या 10 शेअर्समध्ये म्युच्युअल फंडांनी सर्वाधिक गुंतवणूक केली ते जाणून घेऊया.

Mutual funds investment in February 2025

1. एचडीएफसी बँक (HDFC Bank) : म्युच्युअल फंड आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये HDFC बँकेचे सर्वाधिक फंड किंवा शेअर्स खरेदी करण्याचे आपल्याला दिसून येत आहे.नुवामाच्या अहवालानुसार, म्युच्युअल फंडांनी गेल्या महिन्यात 6 हजार कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले आहे.डिसेंबर तिमाहीच्या अखेरीस म्युच्युअल फंडांकडे बँकेत 23.93% हिस्सा होता. शेअर्स त्याच्या शिखरावरून 9% खाली आहे.

2. हेक्सावेअर टेक (Hexaware Tech) :- म्युचल फंड आणि फेब्रुवारी महिन्यात Hexaware Tech फंडाचे मोठ्या प्रमाणावर खरेदी केलेली आहे साधारणपणे या फंडाणे 42 हजार कोटी रुपयांची शेअर्स खरेदी केले आहे.

3. टीसीएस (TCS) : – अहवालानुसार फेब्रुवारी महिन्यात टीसीएस कंपनीने जवळपास 3900 कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले आहे मात्र डिसेंबरच्या तिमाहीत टीसीएस चा फक्त 4.3% होता. सध्या शेअर्स त्याच्या उच्चांकावरून 24% खाली आहे.

हे पण वाचा ~  fixed deposit : मैच्योरिटीपूर्वी Bank FD तोडल्यास किती नुकसान होईल ? जाणून घ्या नियम काय सांगतो ...

4. अल्ट्राटेक सिमेंट (Ultratech Cement) :- भारतातील अग्रगण्य सिमेंट कंपन्या पैकी एक असलेली अल्ट्राटेक सिमेंट कंपनी सध्या सिमेंट बरोबरच वायर आणि केबल व्यवसायात उतरलेली आहे.फंड हाऊसने फेब्रुवारीमध्ये Ultratech Cement 2 हजार 400 कोटी रुपये किमतीचे शेअर्स खरेदी केले आहे. डिसेंबर तिमाहीच्या अखेरीस म्युच्युअल फंडाकडे अल्ट्राटेकमध्ये 12.26% हिस्सा होता. सध्या शेअर्स उच्चांकावरून 13% खाली आला आहे.

5. कोटक महिंद्रा बँक (Kotak Mahindra Bank)

: – कोटक महिंद्रा बँकेचे 2 हजार 300 कोटी रुपयांचे शेअर्स वेगवेगळ्या म्युच्युअल फंड कंपन्यांनी फेब्रुवारीमध्ये खरेदी केले होते. सध्या Kotak Mahindra Bank शेअर 52 आठवड्यांच्या उच्चांकाच्या जवळ व्यवहार करत आहे.मित्रांनो कोटक बँकेत फंड हाऊसचा 17.44% हिस्सा आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don't Copy!!