Mobile Battery : नमस्कार मित्रांनो मोबाईल हा आजकालच्या लोकांच्या आयुष्यातील महत्त्वाचा घटक बनलेला आहे. अनेक लोकांची तीच एक जीवनावश्यक गरज बनली आहे. मोबाईल शिवाय दिवस काढणे अतिशय कठीण काम झालेले आहे.
आता अशा वेळेस मोबाईलची बॅटरी टिकणे हा एक महत्त्वाचा विषय होऊन बसलेला आहे. तेव्हा आपल्या मोबाईलची बॅटरी खराब होऊ नये त्यासाठी कोणती काळजी घ्यावी ? मोबाईल बॅटरी 100% चार्ज करावी का? मोबाइल बॅटरी चार्ज करताना कोणती खबरदारी घ्यावी? याविषयी सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये बघणार आहोत.
Mobile Battery charge Tips
1) चार्जिंग वेळेस मोबाईल वापर :- मोबाईलच्या अतिवापराने किंवा रेगुलर वापराने मोबाईलची बॅटरी संपल्यानंतर मोबाईल चार्जिंगला लावण्यात येतो. अनेक लोकांना मोबाईल शिवाय करमत नसल्याने मोबाईल चार्ज करताना सुद्धा ते मोबाईल हातात घेऊन बसत असतात.त्यामुळे बॅटरीचे आयुष्य तर कमी होतेच त्याचसोबत स्पोट होण्याचेही चान्सेस असतात. त्यामुळे ही गोष्ट टाळावी.
2) फुल चार्ज नको :- आपल्या मोबाईलच्या बॅटरीचे आयुष्य वाढवण्यासाठी किंवा टिकवण्यासाठी आपला मोबाईल 40% पेक्षा कमी चार्ज आणि 80% पेक्षा जास्त ठेवू नका असं केल्यास मोबाईलची बॅटरी अधिक काळ टिकवू शकत नाही त्यामुळे 40 ते 80 चा फॉर्मुला तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो.
3) मोबाईल डेटा बंद :-मोबाईल बॅटरी चार्ज करत असताना आपण जर मोबाईलचा डाटा चालू ठेवला असेल, ब्लूटूथ, लोकेशन यासारखे फीचर्स चालू असेल तर, ते बंद बंद करावे.
मोबाईल बॅटरी चार्ज करत असताना सुधीर फीचर्स किंवा ॲप्स ओपन असल्यानंतर आपल्या मोबाईलच्या बॅटरीचे आवश्यक कमी होते. त्याचबरोबर 20% पेक्षा कमी चार्जिंग असताना सुद्धा हे फीचर्स वापरणे आपल्या बॅटरीच्या आयुष्यासाठी धोकादायक ठरू शकते,यामुळे बॅटरी खराब होऊ शकते.
मोबाईल बॅटरीचे आयुष्य किती असते?
आजकालच्या वाटचा तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्याला बॅटरीमध्ये नवनवीन फीचर्स उपलब्ध झालेले आहेत. त्यामुळे आपल्या बॅटरीचे आयुष्य किती आहे? हे जाणून घेणे सुद्धा महत्त्वाचे ठरते.
आजकाल मॉडर्न बॅटरीची लाईफ दोन ते तीन वर्षे एवढीच आहे.लिथियम यांच्या बनलेल्या असल्याकारणाने त्यांचे आयुष्य केवळ 2-3 वर्षांपूरतेच मर्यादित राहते.
100% मोबाईल चार्ज करणे योग्य ?
मोबाईल हा दिवसभर पाहता यावा यासाठी अनेकजण 100 टक्के मोबाईल बॅटरी चार्ज करतात.परंतु तुमच्या मोबाईल साठी ही गोष्ट चांगली नसते.
साधारणपणे 80 टक्के पर्यंत बॅटरी चार्ज करणे आपल्या मोबाईलच्या बॅटरी साठी चांगले असते. त्यामुळेच निश्चितच मोबाईलच्या बॅटरीचे आयुष्य वाढण्यास मदत होऊ शकते.