Close Visit Mhshetkari

Medical Bill : शासकीय कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीचे नियम; पहा मेडिकल बिल आजाराची यादी, अटी नियम व सर्व प्रोसेस …

Medical Bill : शासकीय कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीचे नियम महाराष्ट्र राज्य सेवा (वैद्यकीय देखभाल) नियम १९६१ अन्वये व त्यानंतर त्यात केलेल्या सुधारणा नुसार विहित केलेले आहेत.

Medical Bills Application Process

अ) रुग्ण म्हणजे :- 

१. शासकीय कर्मचारी किंवा त्याच्या कुटंबातील कोणतीही व्यक्ती.

२. रजेवर किंवा निलंबित असलेले शासकीय कर्मचारी.

३. पूर्ण वेळ शासकीय सेवेत कार्यरत असलेला कायम अथवा तात्पुरता शासकीय कर्मचारी. शासकीय कर्मचाऱ्याची एक वर्षापेक्षा जास्त सेवा होणे आवश्यक आहे.

ब) कुटुंब म्हणजे :- 

१. शासकीय कर्मचाऱ्याची पती/पत्नी

२. शासकीय कर्मचाऱ्यावर अवलंबून असलेली औरस मुले / सावत्र मुले / कायदेशीर दत्तक घेतलेली मुले

३. शासकीय कर्मचाऱ्यावर पूर्णपणे अवलंबून असलेले आई-वडील (निवृत्ती वेतन मुळ वेतनाच्या रुपये ३५००/- सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय दि.११.११.२०११.) (महिला कर्मचाऱ्याला तिच्या आई-वडीलांची किंवा सासु-सासऱ्याची निवड करता येईल.)

४. शासकीय कर्मचाऱ्यावर पूर्णपणे अवलंबून असलेला १८ वर्षाखालील भाऊ / अविवाहित बहिण व घटस्फोटातील बहिणी (वय लक्षात न घेता.)

क) कुटुंबाची संख्या :-

१. शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभाग दिनांक २०/११/२००० पासून (लागू दिनांक ०१/०५/२००१) शासकीय कर्मचाऱ्याला वैद्यकिय लाभासाठी दोन हयात अपत्याइतके आपले कुटुंब मर्यादित ठेवणे आवश्यक आहे.

२. ०१ मे, २००१ नंतर त्यांच्या कुटुंबातील अपत्यांची संख्या दोन पेक्षा जास्त झाल्यास आई-वडीलांना व सदर मुलालावैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती मिळण्याचा हक्क राहणार नाही.

३. मात्र पहिल्या दोन मुलांना वैद्यकीय सोयी मिळण्याचा हक्क राहिल तसेच जर सदर कुटुंबाने त्यानंतर सक्षम प्राधिकारी अधिकाऱ्याकडून निर्बिजीकरणाची शस्रक्रिया केल्याचे प्रमाणपत्र सादर केल्यास आई-वडीलांना वैद्यकीय सवलती मिळण्याचा हक्क पुन्हा राहील. मात्र तिसऱ्या किंवा त्यापेक्षा जास्त मुलांना अशा सवलती मिळणार नाहीत.

४. सदरचाच नियम तीन हयात मुलांच्याबाबतीमध्ये १/५/२००१ पूर्वी लागू राहील. शासन अधिसूचना क्र. एमआरव्ही-२०००/प्र.क्र. (१७/२०००)/बारा, दि. २८/३/२००५ नुसार शासकीय सेवेत लागताना सध्या छोटे कुटुंबप्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

The Medical Attendant Rules

१. शासकीय कर्मचाऱ्याने वैद्यकीय देखभाल किंवा उपचार पूर्ण झाल्यापासून एक वर्षाच्या आत वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती देयकाची मागणी कार्यालयाकडे करणे आवश्यक आहे.

२. शासकीय कर्मचाऱ्याचे वेतन व भत्ते ज्या लेखाशिर्षाखाली खर्ची घालण्यांत येतात त्याच लेखाशिर्षाखाली वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीची देयके आहरित करावी.

वैद्यकिय देयकाचे प्रकार

सर्वसाधारणपणे वैद्यकिय खर्च प्रतिपूर्ती देयकांचे चार प्रकार आहेत.

१. शासकीय रुग्णालयातील उपचाराचे देयक

२. खाजगी रुग्णालयातील उपचाराचे देयक

३. वैद्यकिय अग्रिम उपचाराचे देयक.

४. विशिष्ट आजाराचे वैद्यकिय खर्च प्रतिपूर्ती

वैद्यकिय खर्च प्रतिपूर्ती देयक मंजूरीचे अधिकार

वैद्यकिय खर्च प्रतिपूर्ती तसेच वैद्यकिय अग्रिम देयके मंजूर करण्यातचे अधिकार खालील प्रमाणे आहेत.

प्राधिकृत अधिकारी आणि अधिकार मर्यादा

१. शासकीय रुग्णालय बाहय रुग्ण उपचार – कार्यालय प्रमुख – पुर्ण अधिकार

२. शासकीय रुग्णालय आंतररुग्ण उपचार – कार्यालय प्रमुख – पुर्ण अधिकार

३. खाजगी रुग्णालय – विभाग प्रमुख – रु.३,००,०००/-

४.खाजगी रुग्णालय – प्रशासकीय विभाग – रु.३,००,०००/- वरील

५.वैद्यकिय अग्रिम – विभाग प्रमुख – रु.१,५०,०००/-

वैद्यकिय खर्च प्रतिपूर्ती देयक आजार यादी

शासन नितीरिष्ठ २७ आकस्मिक व ५ गंभीर आजाराचा समावेश आहे.

१) हृदयविकाराचा झटका(Cardiac emergancy), विकाराचा झटका (Pumonary emergency) ऑन्जिओग्राफी चाचणी. प्रमस्तिक संहनी (Cerabral vascular) फुफ्फुसाच्या

२) अति रक्तदाब (Hypertension)

३) धनुवार्त (Titanus)

४) घटसर्प (Diphteria)

५) अपघात (Accident) आधात संरक्षण (Shock Syndrome) हृदयाशी आणि रक्तवाहिनीशी संबंधी (Cardiological and Vascular)

६) गर्भपात (Abrtions)

७) तीव्र उदर वेदना /आंत्र अवरोध (Actue abdominal pains/ Intestinal Obstrution)

८) जोरदार रक्तस्त्राव (Severe haemorrhage)

९) गॅस्ट्रो-एन्ट्रायटिस (Gastro- Enterietis)

१०) विषमज्वर (Tuphoid)

११) निश्वतेनावस्था (Coma)

१२) मनोविकृती सुरुवात (Onset of psychiatric disorder)

१३) डोळ्यातील दृष्टिपटल सरकणे (Retinal detachment in the eye)

१४) स्त्रीरोगशास्व आणि प्रसुतीशास्त्र संबंधित यांच्याशी आकस्मिक आजार (Foreign body in ear, nose or throat emergency)

१५) जननमुत्र आमस्कि आजार (Genito- Urinary emerency)

१६ वायू कोथ (Gas gangrine)

१७ कान नाक किंवा घसा यामध्ये विजातीय पदार्थ गेल्यामुळे निर्माण झालेले आकस्मिक आजार (Foreign body in ear, nose or throt emergency)

१८) ज्यामध्ये तातडीने शस्त्रक्रिया करणे आवश्यक असते अशा जन्मजात असंगती (Cogenital Anamolies requiring urgent surgical intervention)

१९) ब्रेन ट्यूमर (Brain Tumour)

हे पण वाचा ~  Salary Slip : कर्मचाऱ्यांच्या पगारात कोणकोणत्या भत्याचा समावेश असतो ? पहा दरमहा कोणती कपात होते ? पहा सविस्तर

२०) माजणे (Burns)

२१) इपिलेप्सी (Epilepsy)

२२) अॅक्यूट ग्लॅकोमा (Acute Glaucoma)

२३) स्पायपनस स्कॉड (मज्जारज्जू) संबंधात आकस्मिक आजार

२३) उष्माघात

२५) रक्तासंबंधातील आंजार

२६) प्राणी चावल्यामुळे होणारी विषबाधा

२७) रसायनामुळे होणारी विषबाधा

मेडिकल बिल प्रतिपूर्तीचे देयक आवश्यक कागदपत्रे

वैद्यकिय खर्च प्रतिपूर्तीचे देयक मंजूरीसाठी सादर करताना शासकीय कर्मचाऱ्याला रुग्णाने ज्या ठिकाणी उपचार घेतले आहेत त्या रुग्णालयाच्या प्रकारानुसार कागदपत्रे सादर करावी लागतात. शा नि वित्त विभाग क्र. वैखप्र २०१२/प्र.क्र.३४७/प्रशा २, दि.६/९/२०१४ मध्ये विहीत केल्याप्रमाणे खालील कागदपत्रे वैद्यकिय खर्च प्रतिपूर्ती देयकासोबत जोडणे आवश्यक आहेत.

वैद्यकिय अग्रिम :- शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभाग दि.१०/२/२०१६ अन्वये सध्या खालील पाच गंभीर आजारांकरीता रु.१,५०,०००/- इतके वैद्यकिय अग्रिम विभाग प्रमुखांना मंजूर करता येते.

१. हृदय शस्त्रक्रियेची प्रकरणे

२. हृदय उपमार्ग शस्त्रक्रिया

३. अॅन्जोप्लास्टी शस्त्रक्रिया

४. मुत्रपिंड प्रतिरोपण शस्त्रक्रिया

५. कर्करोग

सदरील पाच गंभीर आजारांकरीता रु.१,५०,०००/- इतके वैद्यकिय अग्रिम विभाग प्रमुखांना मंजूर करता येते

वैद्यकिय अग्रिम मंजूर अटी व शर्ती

वैद्यकिय अग्रिम मंजूर करताना खालील अटी व शर्ती आहेत.

१. सदरचे अग्रिम हे फक्त ५ गंभीर आजारांकरीता शासकीय अथवा सदर आजारांकरीता शासनमान्य खाजगी रुग्णालयांकरीताच मंजूर करता येते..

२. कर्मचारी जर अस्थायी असेल तर त्याने दोन स्थायी कर्मचाऱ्यांचे जामीन देणे आवश्यक आहे. तसेच सोबत कुटुंब प्रमाणपत्र जोडावे.

३. अग्रिमासोबत रुग्णालयाचे शस्त्रक्रियेचा दिनांक व शस्त्रक्रियेकरीता संभाव्य खर्च दर्शविणारे पत्र जोडणे आवश्यक आहे. तसेच अग्रिमाचा धनादेश संबंधित रुग्णालयाच्या नावानेच देणे आवश्यक आहे.

४.सदरचे अग्रिम हे संबंधित कर्मचाऱ्यास शस्त्रक्रिये पुर्वी जास्तीत १५ दिवस आधी देता येते.

५.ज्या कारणासाठी अग्रिम मंजूर करण्यात आले आहे, त्याच कारणासाठी त्याचा उपयोग झाला पाहिजे.

६.अग्रिम मंजूर झाल्यापासून ६ महिन्यांत त्याचे समायोजन होणे आवश्यक आहे, अन्यथा अग्रिमाची वसुली घरबांधणी अग्रिमासंबंधीच्या व्याजदराने करण्यात येईल.

वैद्यकिय खर्च प्रतिपूर्तीचे देयक सादर करताना खालील बाबी प्रामुख्याने लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

१. परिशिष्ट १ पुर्ण भरावे.

२. नमुना क व ड वरील सर्व रकाने व्यवस्थित भरुन दोन्ही मधील रकमा जुळणे आवश्यक आहे.

३. नमुना ड वर रुग्णालयाचा नोंदणी क्रमांक न चुकता नमुद करावा.

४. औषधांची प्रमाणके संबंधित वैद्यकिय अधिकाऱ्याकडुन प्रमाणित करुन घ्यावीत.

५. देयकासोबत सर्व चाचणी अहवाल जोडावेत.

६. ज्या कालावधीत रुग्ण आंतररुग्ण म्हणून रुग्णालयात दाखल असेल, त्याच कालावधीतील औषधे / चाचण्या / उपकरणे यांच्या रकमा देयकात घेण्यात याव्यात.

७. एका वर्षापेक्षा जास्त कालावधीनंतर देयक सादर केल्यास कर्मचाऱ्याने देयक कार्यालयास सादर केल्यानंतर देयकाच्या झालेल्या प्रवासाबद्दत प्रत्येक टप्पेनिहाय नमूद करावे.

८. ज्या लेखाशिर्षाखाली देयक खर्ची टाकावयाचे आहे, त्याचा संपूर्ण तपशिल प्रस्तावात न चुकता नमूद करावा.

९. वैद्यकिय खर्च प्रतिपूर्ती देयकाकरीता www.mahakosh.in या संकेतस्थळावरील Employee Corner – Useful Form या लिंकवरील दिलेल्या विवरणपत्रातच देयक सादर करावे.

१०. काही कर्मचाऱ्यांकडुन बऱ्याचवेळा जोडुन असलेल्या कालावधीचे देयक सादर करताना एका दिवासाचा वास्तव्याचा खर्च दोन्ही देयकात आकारला जातो, तो एकाच देयकात नमूद करावा,

११. वैद्यकिय अग्रिम देयके बऱ्याचवेळा अचानक सादर करावी लागतात, अशा वेळेस जर संचालनालयातील संबंधितांना पुर्व कल्पना दिल्यास त्याप्रमाणे देयक तातडीने मंजूर करण्यात मदत होईल.

१२. जर वैद्यकिय खर्च प्रतिपूर्ती देयकात किरकोळ आक्षेप असल्यास संचालनालयाकडुन संबंधितास त्याची पूर्तता करावयास दुरध्वनीद्वारे सांगितले जाते. अशा वेळेस त्याची त्वरीत पूर्तता करावी.

१३.संचालनालयाकडुन ज्या वेळेस एखाद्या देयकाबाबत आक्षेप घेतला जातो त्या वेळेस संबंधित कर्मचाऱ्याने सादर केलेल्या खुलाशावर कार्यालय प्रमुखाने (कोषागार अधिकारी / सहसंचालक / अधिदान व लेखा कार्यालय) स्वतःचे स्पष्ट अभिप्राय देऊनच देयक सादर करणे आवश्यक आहे.

१४.ठराविक रुग्णालयामध्ये ठराविक उपचारासाठी पॅकेज ठरवुन दिलेले असतात, अशा वेळेस सदर पॅकेजचा तपशिल देयकाची अचूक परिगणना करण्यासाठी सादर करणे आवश्यक आहे.

देयके संचालनालयात सादर करताना सोबत वित्त विभाग शासन निर्णय दि.६/९/२०१४ प्रमाणे चेकलिस्ट जोडावी.

जर एखाद्या कर्मचाऱ्यास दि.१/५/२००१ पुर्वीची तीन पेक्षा जास्त मुले असतील तर सोबत निर्बिजीकरणाची शस्त्रक्रिया केल्याचे प्रमाणपत्र जोडण्याची आवश्यक्यता आहे.

१५.ज्या खाजगी रुग्णालयात इंन्टा ऑक्युलर लेन्स बसवली असल्यास त्याची किंमत शासकीय रुग्णालया इतकी सिमित करण्यात यावी.

१६.अधिक माहितीसाठी अधिदान व लेखा अधिकारी कार्यालयात देयके पारीत करतानाची चेकलिस्ट सोबत जोडली आहे.

1 thought on “Medical Bill : शासकीय कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीचे नियम; पहा मेडिकल बिल आजाराची यादी, अटी नियम व सर्व प्रोसेस …”

  1. हा लाभ सेवानिवृत्त कर्मचार्यासाठी आहे काय?

    Reply

Leave a comment

error: Don't Copy!!