Medical Allowance : महाराष्ट्र समचिकित्सा वैद्यक व्यवसायी अधिनियम, १९५९ मधील कलम १५ च्या उपकलम (६) मध्ये परिषदेस या अधिनियमाखालील आपली कर्तव्ये व कार्ये पार पाडण्याच्या प्रयोजनार्थ, आवश्यक असतील अशा इतर अधिका-यांची व कर्मचा-यांची संख्या व पदनामे आणि त्यांचे वेतन,भत्ते व सेवेच्या इतर शर्ती, विनियमांद्वारे वेळोवेळी विहित करण्याबाबत तरतूद आहे.
कर्मचारी वैद्यकीय भत्ता वाढ
महाराष्ट्र होमिओपॅथी परिषद,मुंबई या कार्यालयातील अधिकारी / कर्मचाऱ्यांना वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती अनुज्ञेय नाही.परिषदेच्या कर्मचाऱ्यांना शासन निर्णयातील तरतूदीनुसार सन २०१३-१४ या आर्थिक वर्षापासून प्रतिवर्षी रु.१५,०००/- इतका वैद्यकीय भत्ता अदा करण्यात येतो.
सद्य:स्थितीत वैद्यकीय उपचारावर होणारा खर्च विचारात घेता सदर रक्कम कमी पडत असल्याने परिषदेतील कर्मचाऱ्यांना सेवेत असताना वैद्यकीय उपचारावर होणारा खर्च भागविण्यासाठी प्रतिवर्षी वैद्यकीय भत्ता वाढवून देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने शासनाने पुढील निर्णय घेतला आहे.
Employee Medical Allowance Hike
महाराष्ट्र होमिओपॅथी परिषद, मुंबई या कार्यालयातील अधिकारी / कर्मचाऱ्यांना सेवेत असताना वैद्यकीय उपचारावर होणारा खर्च भागविण्यासाठी प्रतिवर्षी रु. ३०,०००/- (अक्षरी रुपये तीस हजार फक्त) इतका वैद्यकीय भत्ता सन २०२४-२५ या आर्थिक वर्षापासून पुढील अटी व शर्तीच्या अधीन राहून अदा करण्यास शासन मंजूरी देण्यात आला आहे.
अ) वैद्यकीय भत्त्यापोटी अदा करावयाची रक्कम परिषदेने आपल्या स्वनिधीतून भागवावी.
ब) सद्यःस्थितीत तसेच भविष्यात वैद्यकीय भत्त्यासाठी शासनाकडून परिषदेस कोणत्याही स्वरुपाचे अर्थसहाय्य करण्यात येणार नाही.