MCX Gold Rates : नमस्कार मित्रांनो, आपल्याला माहिती असेल की सोन्याच्या दरांमध्ये अलीकडेच मोठी वाढ झाली आहे.१० ग्रॅम सोन्याचा दर ९० हजार रुपयांच्या उंबरठ्याजवळ पोहोचला आहे.
सोमवारी राजधानी दिल्लीत १० ग्रॅम सोन्याचा दर ८८ हजार ५०० रुपये एवढा विक्रमी उच्चांक गाठला. यामध्ये २,४३० रुपये इतकी वाढ झाली आहे. या वाढीमागे जागतिक बाजारातील सोन्याच्या किमतीत वाढ आणि रुपयाचा अवमूल्यन ही मुख्य कारणे आहेत.
Globle MCX Gold Market
जागतिक बाजारात सोन्याच्या किमती विक्रमी पातळीवर पोहोचल्या आहेत.अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापार धोरणांमुळे जागतिक स्तरावर अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.गुंतवणूकदार सोन्यासारख्या सुरक्षित गुंतवणुकीकडे वळले आहेत, ज्यामुळे सोन्याच्या मागणीत वाढ झाली आहे.
मित्रांनो आपल्या देशात रुपयाचे डॉलरच्या तुलनेत अवमूल्यन झाल्यामुळे,भारतात सोन्याच्या किमती वाढल्या आहेत.आयात केलेल्या सोन्यावर रुपयाचा दुर्बलपणा परिणामकारक ठरतो.डोनाल्ड ट्रम्प यांनी स्टील आणि अॅल्युमिनियमच्या आयातीवर २५% कर लादला आहे.सदरील निर्णयामुळे जागतिक बाजारातील अनिश्चितता वाढली आहे, ज्यामुळे गुंतवणूकदार सोन्याकडे वळले आहेत.
Today’s Gold Silver Rates
२४ कॅरेट सोने : – भारतात २४ कॅरेट सोन्याचा दर ८६,०७० रुपये प्रति १० ग्रॅम इतका आहे.९९.५% शुद्धतेच्या सोन्याचा दर ८८,१०० रुपये प्रति १० ग्रॅम इतका वाढला आहे.
चांदीचे दर : – चांदीच्या किमतीत १ हजार रुपये इतकी वाढ झाली आहे.चांदीचा दर ९७,५०० रुपये प्रति किलो इतका आहे.
शेअर बाजाराचा प्रभाव
शेअर बाजारातील अस्थिरतेमुळे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीकडे वळत आहेत.सोने आणि चांदी यांसारख्या मूल्यवान धातूंच्या मागणीत वाढ झाली आहे.ING बँकेचा अहवालानुसार अमेरिका आणि चीनमधील व्यापारी तणावामुळे सोन्याच्या किमती आणखी वाढू शकतात.सोन्याचा दर $३,००० प्रति औंस पर्यंत पोहोचू शकतो.
शहर | २४ कॅरेट सोने | २२ कॅरेट सोने |
---|---|---|
दिल्ली | ₹८८,५०० | ₹८१,००० |
मुंबई | ₹८५,६६५ | ₹७८,५०० |
चेन्नई | ₹८७,००० | ₹८०,००० |
कोलकाता | ₹८६,५०० | ₹७९,५०० |