Close Visit Mhshetkari

Life Insurance : मोठी बातमी … जीवन विमा पॉलिसीधारकाने आत्महत्या केल्यास विम्याचे पैसे वारसांना मिळतात का ? पहा नियम….

Life Insurance : नमस्कार मित्रांनो आपल्याला माहिती असेल की देशासह जगभरात अनेक लोक नैराश्यामुळे आत्महत्या करत आहेत. अनेक लोक नैराश्येत जाऊन किंवा कौटुंबिक वादविवादातून हार म्हणून आपले जीवन संपावर आहेत. जीवन जीवन हार मानून संपवत असतात.

Term life Insurance New Rules

 मित्रांनो आजकालच्या जमान्यात टर्म इन्शुरन्स किंवा हेल्थ इन्शुरन्स घेणे आणि त्याची गरज झालेली आहे बरेच लोक आपला विमा उतरवत असतात.अशा वेळी आत्महत्या केल्यानंतर इन्शुरन्स केलेल्या व्यक्तीस विमा मिळतो का? हा मोठा प्रश्न पडतो तर चला मित्रांनो पाहूया याविषयी सविस्तर माहिती.

मृत्यू झाल्यास विमाधारक व्यक्तीचे वारसदार विम्याच्या पैशावर दावा करू शकतात. असे असले तरी मित्रांनो यासाठी काही टर्म अँड कंडिशन्स असतात. पॉलिसी उतरवणे अगोदर या अटी व शर्ती पूर्ण केल्यानंतरच नॉमिनीला किंवा विमाधारकाच्या वारसाला कंपनीकडून विम्याचे पैसे हस्तांतरित केले जातात.

1 जानेवारी 2024 आधी जारी केलेल्या जीवन विमा पॉलिसींच्या बाबतीत पॉलिसी सुरू झाल्यापासून किंवा नूतनीकरण झाल्यापासून 12 महिन्यांच्या आत विमाधारकाने आत्महत्या केल्यास पॉलिसी रद्द होते.

विमा उतरवल्यानंतर बारा महिन्याच्या पश्चात विमाधारक व्यक्तीने आत्महत्या केल्यास संपूर्ण विमा रक्कम वारसाला मिळते.

1 जानेवारी 2024 नंतर जारी केलेल्या पॉलिसीच्या बाबतीत आत्महत्या कलमात बदल करण्यात आले असून, जीवन विमा पॉलिसी घेतल्याच्या 1 वर्षाच्या आत विमाधारकाने आत्महत्या केल्यास भरलेल्या एकूण प्रीमियमच्या 80 % रक्कम नॉमिनीला दिली जाते. त्याचवेळी पॉलिसी घेतल्यापासून 1 वर्षापेक्षा जास्त काळ झाला असेल, तर वारसदारांना विमा पॉलिसीची संपूर्ण रक्कम दिली जाते.

हे पण वाचा ~  Health Insurance : हेल्थ इन्शुरन्स म्हणजे काय ?आरोग्य विमा घेतल्याने कुटुंबासह आपल्याला मिळतात असंख फायदे ; पहा सविस्तर ..

जीवन विमा पॉलिसी नियम

आपल्या विमा पॉलिसीमध्ये आत्महत्या कव्हरेज आपण घेतले आहे का हे सुद्धा पाहणे महत्त्वाचे असते.बरेच पॉलिसी कंपनी विमा उतरवताना आत्महत्या कव्हरेज देत नाही किंवा वगळतात तेव्हा पॉलिसी वगळताना आत्महत्या कव्हरेस्टच्या सुद्धा समावेश असणे आवश्यक आहे.

थोडक्यात सांगायचे झाल्यास जीवन विमा उतरवताना साधारणपणे 12 महिन्याच्या आत आत्महत्या केल्यास विमा शक्यतो मिळत नाही, त्याचबरोबर अपघात झाला असता संपूर्ण विमा रक्कम विमाधारकाच्या वारसांना मिळू शकते.

पॉलिसी धारकांनी आत्महत्या केली असल्यास त्याची संपूर्ण कुटुंब आर्थिक व भावनिक दृष्ट्या उद्ध्वस्त झालेले असते. त्यामुळे कुटुंबाला विम्याची रक्कम मिळण्यासाठी आपली पॉलिसी वेळेच्या वेळेवर जेणेकरून, पॉलिसी धारकांच्या कुटुंबाला विम्याचे रक्कम मदत होईल.

पॉलिसीधारकाने चुकीची माहिती दिल्यानंतर सुद्धा पॉलिसीच्या रकमेचा दावा रद्द होऊ शकतो. आत्महत्येच्या प्रसंगात विम्याची रक्कम द्यायला अयोग्य कारणे दाखवून विमा कंपनी नकार देत असेल, तर भारतीय विमा विनियामक आणि विकास प्राधिकरणाच्या विमा लोकपालाकडे आपण तक्रार दाखल करता येते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

1 thought on “Life Insurance : मोठी बातमी … जीवन विमा पॉलिसीधारकाने आत्महत्या केल्यास विम्याचे पैसे वारसांना मिळतात का ? पहा नियम….”

error: Don't Copy!!