Jilha Parishad Scheme : महिला व बालकल्याण विभाग जिल्हा परिषद बुलडाणा अंतर्गत सन 2023-24 करिता विविध योजना राबविण्यात येत आहे.सदरील योजना अंतर्गत जिल्हा परिषद सेस विशेष घटक योजना/ अदिवासी घटक उपयोजना 2023-24 अंतर्गत ग्रामिण भागातील महिला व मुलीला 90% अनुदानावर थेट लाभ हस्तांतरन (DBT) द्वारे निवड झाली आहे.
Jilha Parishad Scheme 2024
बुलढाणा जिल्हा परिषद द्वारे दि.07/10/2024 रोजी वैयक्तिक लाभाच्या योजनांची इश्वर चिठठीने निवड केलेले लाभार्थी यादी जाहीर करण्यात आली आहे.सदर लाभार्थी यांची यादी योजना निहाय ई – मेल द्वारे प्रकल्प स्तरावर पुरविण्यात आलेली आहे.
1 .बालविकास प्रकल्प कार्यालया कडुन निवड झालेल्या लाभार्थी यांना संबधित योजनासाठी निवड झाली असुन विहीत कालावधीत साहित्य खरेदी करणे बाबत लाभार्थी यांना लेखी कळवावे. सोबतच लाभार्थी यांचा वयाचा दाखला जात प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्र जे अर्जा सोबत जोडेलेले होते त्यांची मुळ कागदपत्र यांची प्रत्यक्ष पडताळणी करावी या बाबत लाभार्थी यांना लेखी कळवण्यात आले आहे.
सर्व कागदपत्रांची पडताळणी झाल्यावर संबधित लाभार्थी जर पात्र होत असेल तर त्यांना साहित्य खरेदी करण्यास सुचीत करावे त्या साहित्यावर योजनाचे नाव व लाभार्थी यादी मधील क्रमांक हे कलर ने लाभार्थी यांनी साहित्याच्या दर्शनी भागावर लिहुन घ्यावे. यापुर्वी या योजने चा लाभ घेतलेला असेल किंवा कागदपत्र बनावट सादर केलेले असतील तर संबधित लाभार्थी यांना लाभ देउ नये तसा अहवाल या कार्यालयास उलट टपाली सादर करावा.
2. लाभार्थी यांना साहित्य दि. 15/10/2024 ते ते 21/11/2024 या कालावधीत खरेदी करुन GST / SGST नमुद असलेले देयक लाभार्थी यांनी बालविकास प्रकल्प अधिकारी यांचे कार्यालया कडे सादर करावे. देयकावर एका बाजुला लाभार्थी यांची स्वाक्षरी। रुच्या पावती टीकीट वर घेण्यात यावी. तसेच देयकावर दुकानदार यांची स्वाक्षरी सुध्दा असावी
3. लाभार्थी यांनी साहित्य घेतल्या नंतर लाभार्थी चा साहित्या सोबतचा कलर फोटो GPS (पोस्ट काड साईडा) सोबत महिला बालविकास कार्यालयाचे प्रतिनीधी जसे अंगणवाडी पर्यवेक्षीका वालविकास प्रकल्प अधिकारी हे उपस्थित असावे.
4. लाभार्थी यांनी निवड झालेल्या योजना मध्ये प्रत्यक्ष साहित्य घेतलेले असुन त्याची पडताळणी महिला व बालकल्याण विभागा कडुन झाली असल्या बाबत बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी पडताळणी करुन स्थळपाहाणी अहवाल देयका सोबत सादर करावा (अंगणवाडी पर्यवेक्षीका / बालविकास प्रकल्प अधिकारी)
5. देयका सोवत लाभार्थी यांचे साहित्य वापरा बाबत व जतन करण्या बाबतचे प्रतिज्ञापत्र सादर करण्यात यावे.
6. देयका सोबत लाभार्थीच्या नावाने राष्ट्रीयकृत बँक पासबुक डोराक्स आधार लिंक असलेले ज्यावर IFSC कोड नमुद असावा ही कॉपी क्लीअर असेल तरच ते देयक बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी स्विकारावे. अस्पष्ट / ओळखायला न येणारे देयके या कार्यालयास सादर केल्यास ते नकारण्यात येतील यांची नोंद सर्वांनी नोंद घ्यावी या बाबत कोनताही पत्र व्यव्हार केला जाणार नाही तसेच याची संपूर्ण जबाबदारी ही प्रकल्प अधिकारी व लाभार्थी यांची असेल.
7. देयकावर कोनत्याही प्रकारची खोडतोड अथवा संबधित देयक बनावट असल्यास व वित्त विभाग जिल्हा परिषद बुलढाणा यांचे कडून नाकारल्यास याची संपूर्ण जबाबदारी ही त्या लाभार्थी यांची असेल. लाभार्थी यांना प्यावयाच्या साहित्याचे विवरण खालील प्रमाणे आहे वा बाबत वालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाने पडताळणी करणे अपेक्षीत आहे.
जिल्हा परिषद योजना साहित्य यादी
- पिठाची गिरणी/चक्की :- 3 HP Copper Moter, 1 Year Grantee साहित्याची किंमत 23500/-90% ने शासना कडुन मिळणारे अनुदान 21150/-
- पिक्को व फॉल मशिन – Top Table Moter, Led Light, 5 Year Warranty – 10450/- 90% ने शासना कडुन मिळणारे अनुदान 9405/-
- शाळकरी लेडीज सायकल मुलींसाठी – A1 / लेडीज सायकल, ISI मार्क, डिक्स ब्रेक्स, सीट, चैन कव्हर, लॉक घंटी सह – 6000/-90% ने शासना कडुन मिळणारे अनुदान 5400/-
देयकावर निर्देशीत केलेल्या किमती पेक्षा कमी असेल तर त्या किमतीच्या 90% रक्कम लाभार्थी यांना मिळेल. परंतु लाभार्थी यांनी सुचीत केलेल्या किमती पेक्षा कितीही किमतीचे साहित्य विकत घेउन देयक सादर केलेले असेल तरीही निर्देशीत केलेली रक्कमच वर नमुद केल्या प्रमाणे 90% अनुदान मीळेल या बाबत सुध्दा लाभार्थी यांना अवगत करावे. एका साहित्याचे एकच देयक सादर करावे लागणार आहे.
ZP Schemes 2024
साहित्याचे बाबतीत वेळोवेळी जिल्हा परिषद बुलढाणा तसेच तत्सम विभागा कडुन होणाऱ्या पडताळणी वेळी सदर साहित्य आढळले नाही, तर होणाऱ्या कार्यवाहीस संबधित लाभार्थी जबाबदार असेल. या बाबत सुध्दा संबधित लाभार्थी यांना आपल्या विभागाच्या वतीने सुचीत करावे.
लाभार्थी निवडीची Soft Copy Excel Sheet आपणास ई मेल वर उपलब्ध करुन देण्यात येत असुन त्या मध्ये लाभार्थीचे बँक डिटेल्स व आधार डिटेल्स / मोबाईल नंबर अपडेट करुन देयका सोबत हार्ड कॉपी व Soft Copy सादर करावीलागणार आहे.
मोफत पिठाची गिरणी, शिलाई मशिन व सायकल वाटप लाभार्थी यादी ➡️ ZP Scheme List
सदरील लाभार्थी यांना आवश्यक त्या लेखी स्वरुपात सुचना लाभार्थी यांना देऊन विनांक 21/11/2024 पर्यन्त कोणत्याही परीस्थीती मध्ये देयके या कार्यालयास सादर करण्यात यावी.भविष्यात देयका वाबत ऑडीट मुददा / तक्रार आल्यास वसुली निघाल्यास याची संपूर्ण जबाबदारी ही लाभार्थी तसेच संबधित बाविप्रअ यांची असेल याची नोंद घ्यावी लागेल.