Internet Safety Tips : मोबाईल व संगणकवर इंटरनेट वापरताना कसे रहायचे सुरक्षित? या सोप्या टिप्स ठरतील लाखमोलाच्या..

Internet Safety Day 2024 : आजचे युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे असे म्हटले जाते.आजकाल जेवढा इंटरनेटचा वापर वाढला आहे, तेवढाच इंटरनेटवरील धोकाही वाढला आहेत. 

सध्या इंटरनेटवरील सुरक्षेसाठी फेब्रुवारीतील दुसरा मंगळवार हा Internet sefty Day म्हणून साजरा केला जातो आहे. यानिमित्त आज आपण सायबर सुरक्षेबाबत काही Tips पाहणार आहे.

Internet Safety Tips 2024

1. इंटरनेट कनेक्शन : सार्वजनिक ठिकाणचा वायफाय वापरताना खबरदारी घ्यावी. शक्यतो व्हीपीएन वापरण्याचा विचार करा.

2. पासवर्ड :- आपला पासवर्ड मजबूत आणि युनिक असावा. साधा नेहमी वापरणारा पासवर्ड टाळावा.आपण Google चे पासवर्ड व्यवस्थापक वापरु शकता.

3. नेहमी अपडेट रहा : तुमचे डिव्हाइस, सॉफ्टवेअर आणि अ‍ॅप्स अपडेट ठेवावे.शक्य असल्यास सिक्युरिटी पॅच लावावा.

4. धोकादायक लिंक्स : आपण संशयास्पद अनोळखी लिंकवर क्लिक करणे टाळावे.लिंकवर क्लिक करण्यापूर्वी URL तपासावा 

5. टू-स्टेप्स ऑथेंटिकेशन : आपल्या खात्याचे टू-स्टेप्स ऑथेंटिकेशन (2FA) सक्षम करावे सोबत मल्टी-फॅक्टर ऑथेंटिकेशन (MFA) वापरावे.

6. अँटीव्हायरस :- आपण जर लॅपटॉप संगणक वापरत असाल तर एक चांगले अँटीव्हायरस सॉफ्टवेअर इंस्टॉल करावे.आपण वापरत असलेले अँटीव्हायरस सॉफ्टवेअर अपडेट ठेवावे.

7. डीपफेक व्हिडिओ : सध्या डिपफेक व्हिडिओ ने धुमाकूळ घातला आहे, त्यामुळे डीपफेक व्हिडिओ ओळखण्यासाठी सावधगिरी बाळगावी.आपल्याला प्राप्त झालेले व्हिडियोची सत्यता पडताळून पाहणे आवश्यक असते.व्यक्तीचे एक्स्प्रेशन,डोळे आणि तोंडाची हालचाल तपासावी.

शक्यतो सार्वजनिक संगणकावर वैयक्तिक माहिती भरणे टाळावे.आपल्या ऑनलाईन खात्याबद्दल सावधगिरी बाळगावी.सोशल मीडियावर तुमची गोपनीयता सेटिंग्ज तपासावी.सायबर सुरक्षाविषयी जागरूक रहावे.सायबर गुन्ह्यांची तक्रार करण्यास घाबरू नका.

Leave a Comment

error: Don't Copy!!