Close Visit Mhshetkari

Increments Calculator : वार्षिक वेतन वाढ म्हणजे काय ?  वेतनवाढ किती, केव्हा व कसे मिळते; पहा सविस्तर

Increments Calculator : महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ मधील नियम ३९ नुसार समय श्रेणीतील वेतनवाढीसाठी १२ महिन्याचा कालावधी विचारात घेण्यात येतो. समयश्रेणीतील वेतनवाढीसाठी हिशेबात घ्यावयाचा कालावधी वरील नियमातील पोटनियम २ (बी) मध्ये नमूद करण्यात आला आहे.

Increments in Pay Matrix

सहाव्या वेतन आयोगाच्या अनुषंगाने सुधारित वेतन नियम, २००९ मधील नियम १० नुसार सर्व राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना दरवर्षी १ जुलै या एकाच दिनांकास वार्षिक वेतनवाढ मंजूर करण्याची तरतुद होती.

दि. १ जुलै रोजी ज्या कर्मचाऱ्यांची सुधारित वेतनसंरचनेमध्ये ६ महिने किंवा त्यापेक्षा अधिक सेवा पूर्ण होईल ते कर्मचारी दि.१ जुलै रोजी वेतनवाढ मिळण्यास पात्र आहेत.

सुधारित वेतन मॅट्रिक्समधील वेतनवाढीचा दिनांक

विद्यमान वेतन संरचनेतील १ जुलै या वेतनवाढीच्या दिनांकाऐवजी सुधारित वेतन मॅट्रिक्समध्ये १ जानेवारी किंवा १ जुलै असे दोन वेतनवाढीचे दिनांक असतील.

कर्मचाऱ्यास त्याची नियुक्ती/पदोन्नती किंवा आर्थिक श्रेणीवाढ या बाबी विचारात घेऊन १ जानेवारी किंवा १ जुलै यापैकी एक वेतनवाढीचा दिनांक अनुज्ञेय होईल.

असाधारण रजेवर असल्यास वार्षिक वेतनवाढ

सुधारित तरतुदीच्या अनुषंगाने वैद्यकीय प्रमाणपत्राशिवाय अन्य असाधारण रजेवर असलेल्या कर्मचा-यांची वार्षिक वेतनवाढ कशाप्रकारे विनियमित करावी याबाबत प्रश्न उपस्थित झाला होता.

केंद्र शासकीय कर्मचाऱ्यांकरीता संदर्भाधीन दि.२.७.२०१० च्या कार्यालयीन ज्ञापनान्वये स्पष्टीकरण करण्यात आले आहे. त्याच धर्तीवर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय कारणाव्यतिरिक्त अन्य असाधारण रजेच्या अनुषंगाने वार्षिक वेतनवाढ खालीलप्रमाणे विनियमित करण्यात आले आहे.

अ) शासकीय कर्मचारी मागील वर्षाच्या १ जुलैपासून चालू वर्षाच्या ३० जूनपर्यंत सहा महिने किंवा त्यापेक्षा कमी कालावधीसाठी वैद्यकीय प्रमाणपत्राशिवाय असाधारण रजेवर असल्यास, त्याला चालू वर्षाच्या १ जुलै रोजी वार्षिक वेतनवाढ अनुज्ञेय होईल.

हे पण वाचा ~  State Employees : अतिशय महत्त्वाची अपडेट ! सरकारी कर्मचाऱ्यांच्या बडतर्फेवर विलंबना संदर्भात नवीन शासन निर्णय ...

ब) शासकीय कर्मचारी मागील वर्षाच्या १ जुलैपासून चालू वर्षाच्या ३० जूनपर्यंत सहा महिन्यापेक्षा अधिक कालावधीसाठी वैद्यकीय प्रमाणपत्राशिवाय असाधारण रजेवर असल्यास, त्याला चालू वर्षाच्या १ जुलै रोजी वार्षिक वेतनवाढ देय न होता, ती पुढील वर्षाच्या दिनांक १ जुलै रोजी अनुज्ञेय होईल.

कोरोना काळातील वार्षिक वेतनवाढ

अनेक राज्य शासकीय कर्मचारी शासनाने जाहीर केलेल्या टाळेबंदीच्या (Lock Down) कालावधीत शासनाने आदेशीत केल्यानुसार कार्यालयात हजर राहिले आहेत.

ज्यांनी घरात राहून शासकीय कामकाज पार पाडले आहे व ज्यांची दि.३० जून ह्या तारखेस किमान सहा महिन्यांची अर्हताकारी सेवा पूर्ण होत आहे, अशा कर्मचाऱ्यांना दि. ०१ जुलै रोजीची वार्षिक वेतनवाढ अनुज्ञेय राहील.

Extra increments for Employees

वित्त विभागाच्या दिनांक २८ जून, २०२३ च्या संदर्भीय परिपत्रकान्वये वित्त विभागाच्या दिनांक ३० जून रोजी सेवानिवृत्त झालेल्या / होणाऱ्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना लगतच्या १ जुलै ची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेऊन सेवानिवृत्तीवेतन निश्चित करण्याबाबत मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत.

परिविक्षाधीन कर्मचाऱ्याची पहिली वेतनवाढ

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ मधील नियम ३९ (१) अपवाद (१) (ए) (एक) नुसार परिविक्षाधीन म्हणून एखादया पदावर थेट नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्याची पहिली वेतनवाढ, त्याचा एक वर्षाचा परिविक्षेचा कालावधी पूर्ण झाल्यावर देण्यात यावी अशी तरतूद आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don't Copy!!