Income Tax Rules : नमस्कार मित्रांनो आपल्याला माहिती असेल की आता लवकरच 2025 26 हे नवीन आर्थिक वर्ष सुरू होत आहे.आयकर दात्यांना या नवीन आर्थिक वर्षात म्हणजेच 1 एप्रिल 2025 पासून मोठा दिलासा मिळणार आहे यामध्ये टॅक्सचे गणित बदललेले आपल्याला पाहायला मिळेल तर काय आहे बद्दल पाहूया सविस्तर…
Income Tax Rules changes from April
इनकम टॅक्सच्या सेक्शन 87A अंतर्गत कर सवलत आता 25,000 वरून 60,000 रुपये होणार आहे. सदरील स्टॅंडर्ड रिडक्शन 12 लाखांपर्यंतच्या करपात्र उत्पन्नावर मिळणार असली तरी यामध्ये कॅपिटल गेम चा समावेश नसणार आहे.
नवीन कर प्रणालीमध्ये (New Tax Rule) 12 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त होईल. पगारदारांसाठी ही मर्यादा 12.75 लाखांपर्यंत जाईल, कारण नव्या प्रणालीत 75 हजार रुपयांचे स्टँडर्ड डिडक्शन मिळते पण जुन्या कर प्रणालीत (ओल्ड टॅक्स रिजिम) सवलत जैसे थे राहील.
संपत्तीची व्याख्या बदलणार :- 1 एप्रिलपासून तुमच्या कंपनीकडून मिळणाऱ्या सुविधा, जसं की गाडी, मोफत राहण्याची सोय किंवा वैद्यकीय खर्च, यांना संपत्ती मानलं जाणार नाही. तसंच, जर कंपनी तुमच्या किंवा तुमच्या कुटुंबाच्या वैद्यकीय उपचारांसाठी परदेशात खर्च करत असेल, तर तोही संपत्तीत गणला जाणार नाही.
कर स्लॅब आणि दर :- मित्रांनो, नवीन कर प्रणाली एक एप्रिल 2025 पासून बदलणार आहेत मूळ सूट तीन लाख रुपये वरून चार लाख रुपये होईल सर्वात जास्त कर 30 टक्के कर हा 24 लाख रुपये उत्पन्न असलेल्या बसणार आहे.
TDS मर्यादा वाढणार :- बँक ठेवींवरील TDS ची मर्यादा 40 हजार वरून 50 हजार रुपये होईल. यामुळे आयकर वेगवेगळ्या व्यवहारांवर TDS आणि TCS ची मर्यादा वाढल्याचा फायदा होईल.
ULIP वर कर लागणार :- मित्रांनो आपण जर युनिट लिंक इन्शुरन्स प्लॅन मध्ये गुंतवणूक केली असेल तर आपल्याला ULIP मधून मिळणारी रक्कम 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल, तर ती कॅपिटल गेन मानली जाऊन त्यावर इनकम टॅक्सच्या सेक्शन 112A अंतर्गत कर लागणार आहे.
NPS वात्सल्यवर टॅक्स सूट :- नव्या वर्षात पगारदार आणि इतर करदाते आपल्या मुलांच्या NPS वात्सल्य खात्यात पैसे टाकू शकतील आणि जुन्या कर प्रणालीत अतिरिक्त 50 हजार रुपयांची सवलत मिळणार आहे.
दोन मालमत्तांवर नवे नियम :- पगारदार त्याचबरोबर इन्कम टॅक्स प्लेयर व्यक्तींना आपल्या दोन मालमत्तेवर कर लागणार का नाही याविषयी शासन करता होती. आता 1 एप्रिल 2025 पासून दोन मालमत्तांवर (स्वतः राहत असो वा नसो) शून्य मूल्य (nil value) दाखवता येईल, ज्यामुळे कराची गणना सोपी होणार आहे.
Income tax new Updates
- आपण DigiLocker च्या नॉमिनीला तुमचे इक्विटी शेअर आणि म्युच्युअल फंड स्टेटमेंट पाहण्याची परवानगी देऊ शकणार आहात.
- क्रेडिट कार्ड संदर्भात नवीन आर्थिक वर्षात अनेक बदल होणार आहेत ज्याचा फायदा त्यांना मिळणार आहे.
- सरकारी कर्मचाऱ्यांना NPS ऐवजी UPS म्हणजेच युनिफाइड पेन्शन स्कीम निवडण्याचा पर्याय मिळणार आहे.