Income Tax New Slabs : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २०२५ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात एक मोठी घोषणा केली आहे. या अर्थसंकल्पातील नवीन कर सुधारणांनुसार, १२ लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर कोणताही आयकर लागणार नाही.
सदरील घोषणा मध्यमवर्गीय आणि निम्न उत्पन्न गटाच्या लोकांसाठी मोठी दिलासादायक ठरली आहे. या बदलांमुळे करदात्यांना त्यांच्या उत्पन्नातून अधिक पैसे बचत करता येणार आहेत.
Income Tax New Slabs | नवीन कर स्लॅबची रचना
२०२५ च्या अर्थसंकल्पातील नवीन कर स्लॅब खालीलप्रमाणे आहेत.
1) ० ते ४ लाख रुपये :- या उत्पन्न श्रेणीतील व्यक्तींना कोणताही आयकर भरावा लागणार नाही. ही सुविधा विशेषतः निम्न उत्पन्न गटाच्या लोकांसाठी महत्त्वाची आहे.
2) ४ लाख ते ८ लाख रुपये :- उत्पन्नावर फक्त ५% दराने आयकर आकारला जाईल.
3) ८ लाख ते १२ लाख रुपये :- या उत्पन्न श्रेणीतील व्यक्तींना १०% दराने आयकर भरावा लागेल.
4) १२ लाख ते १६ लाख रुपये :- उत्पन्नावर १५% दराने आयकर आकारला जाईल.
5) १६ लाख ते २० लाख रुपये – व्यक्तींना २०% दराने आयकर भरावा लागेल.
6) २० लाख ते २४ लाख रुपये :- श्रेणीतील उत्पन्नावर २५% दराने आयकर आकारला जाईल.
7) २४ लाख रुपयांपेक्षा जास्त :- या उत्पन्न श्रेणीतील व्यक्तींना ३०% दराने आयकर भरावा लागेल.
आता 12 लाखापर्यंतच्या कर सवलत संदर्भात विविध कपाती त्याचबरोबर स्टॅंडर्ड डिडक्शन, होम लोन,घर भाडे भत्ता यांचा समावेश असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पुढील आठवड्यामध्ये इन्कम टॅक्स संदर्भात नवीन विधेयक लोकसभेत मांडल्यानंतर याविषयी सविस्तर माहिती आपल्याला मिळणार आहे.