Close Visit Mhshetkari

Income Tax Deduction : नवीन आयकर प्रणालीत मिळतात 7 प्रकारचे डिडक्शन, जाणून घेऊया काय-काय अतिरिक्त कर सवलत ?

Income Tax Deduction : नवीन करप्रणालीबद्दल अनेकदा असे म्हटले जाते की त्यात अतिरिक्त कर सूट मिळत नाही. परंतु तसे नाही.मित्रांनो,12 लाखांच्या वार्षिक उत्पन्नावर कर सवलती व्यतिरिक्त, आपण इतर कपातीचा लाभ देखील घेता येईल.

केंद्र सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात कर दात्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. इन्कम टॅक्समध्ये 12 लाखांपर्यंत सवतल मिळणार आहे. आयकरचा हा स्लॅब न्यू टॅक्स रिझीमसाठी (New Tax Regime) आहे. तसेच जुन्या कर प्रणालीमध्ये कोणताही बदल केला नाही.

केंद्र सरकारने नवीन प्रणालीची सुरुवात 2020 मध्ये केली होती.यामध्ये जुन्या कर प्रणालीत असलेल्या अनेक सुट रद्द करण्यात आल्या आहेत.2023 मध्ये नवीन प्रणाली डीफॉल्ट करण्यात आले.

नव्या करून प्रणाली बद्दल असे म्हटले जात आहे की, यामध्ये कोणती अतिरिक्त सूट किंवा कर सवलत मिळणार नाही. परंतु 12 लाख वार्षिक उत्पन्न व्यतिरिक्त अनेक गोष्टींवर कर सवलतीचा लाभ मिळणार आहे. तर पाहूया नवीन कर प्रणालीत कोणकोणत्या डिडक्शनचा समावेश असणार आहे.

Income Tax New Deduction

स्‍टँडर्ड डिडक्‍शन : सर्व कर्मचारी आणि पेन्शनधारक यांना नवीन कर प्रणाली अंतर्गत 75 हजार रुपयांपर्यंत स्‍टँडर्ड डिडक्‍शन मिळते.

ग्रॅच्युइटी व रजा : सेवानिवृत्तीनंतर ग्रॅच्युइटी मिळाल्यास आणि उर्वरित रजा नोकरीदरम्यान भरली गेली, तर ती कर सूट अंतर्गत येते. यावर कोणत्याही प्रकारचा कर नाही. नवीन कर प्रणाली किंवा जुनी कर प्रणालीत सर्वांसाठी ही सवलत असणार आहे.

हे पण वाचा ~  Live Travel Concession : खुशखबर ! कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी; LTC संदर्भात सरकारने घेतला मोठा निर्णय..

NPS अंतर्गत सूट : राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (NPS) मध्ये नियोक्त्याने दिलेल्या 14 % योगदानावर कोणत्याही प्रकारचा कर लागत नाही.आपण आयकर कलम 80CCD अंतर्गत या सवलतीचा दावा करू शकता.PF मध्ये योगदानावरही कर सवलत मिळणार आहे.

अग्निपथ योजनेंतर्गत कर सूट : अग्निपथ योजनेंतर्गत जर कॉर्पस निधीमध्ये योगदान देत असाल तर ते कलम 80CCH अंतर्गत कर सवलत मिळणार आहे.

फॅमिली पेन्शन : जर आपल्याला कोणत्याही प्रकारचे फॅमिली पेन्शन मिळत असेल, तर नवीन कर प्रणाली अंतर्गत, 25 हजार रुपयांपर्यंतची वजावट अजूनही उपलब्ध आहे.

कंपनीकडून मिळणाऱ्या भत्त्यांवर सूट : कलम 10(5) अंतर्गत रजा प्रवास भत्ता (LTA), कलम 10(13A) अंतर्गत घरभाडे भत्ता (HRA), कलम 10(14) आणि 10(17) अंतर्गत इतर विशेष भत्ता, कलम 16(2) अंतर्गत मनोरंजन भत्ता यावर कर सवलत देण्यात आली आहे.

गिफ्टवर सूट : वर्षभरात एखाद्या व्यक्तीकडून 50 हजार रुपयांपर्यंतची भेट मिळाली तर कोणताही कर भरावा लागत नाही. आपण नवीन कर व्यवस्था निवडली नसली तरी ही सूट मिळणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don't Copy!!