Close Visit Mhshetkari

HRMS eLeave : आता दि.०१ एप्रिल, २०२४ पासून eLeave ची अंमलबजावणी ! सर्व रजेचे अर्ज HRMS प्रणालीमार्फत; शासन निर्णय निर्गमित…

HRMS eLeave : राज्य शासकीय अधिकारी/कर्मचारी यांच्या सेवापुस्तकविषयक बाबीसंदर्भात eHRMS (Human Resource Management System) प्रणाली विकसित करण्यात आली असून त्याअंतर्गत सर्व शासकीय अधिकारी / कर्मचारी यांची डिजिटल सेवापुस्तके तयार करण्यात येत आहेत.

eHRMS Leave system

सर्व प्रशासकीय विभागांच्या नियंत्रणाखालील अधीनस्थ कार्यालयांचा (उदा. आयुक्तालय, संचालनालय इ.) समावेश या eHRMS प्रणालीत करण्यात येत आहे. सदर प्रणालीवर सर्व अधिकारी / कर्मचारी यांची सेवापुस्तकविषयक माहिती भरण्याबाबत सर्व संबंधित विभागांना दि.०३ मार्च, २०२३ च्या परिपत्रकान्वये सूचना देण्यात आल्या आहेत.

eHRMS प्रणालीमध्ये leave या सेक्शनमध्ये रजेचे ऑनलाईन अर्ज सादर करण्याची सुविधा आहे. तथापि बऱ्याच विभागांमध्ये ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे प्रमाण फारच कमी असल्याचे आढळून आले आहे. HRMS प्रणाली यशस्वीरीत्या कार्यान्वित होण्याकरिता प्रत्येक विभागातील सर्वच अधिकारी/कर्मचाऱ्यांनी त्यांचे रजेचे अर्ज ऑनलाईन सादर करणे आवश्यक आहे.

Human Resource Management System

आता सर्व मंत्रालयीन विभागांना सूचित करण्यात आले आहे की, त्यांनी त्यांच्या अधीनस्थ असलेल्या सर्व अधिकारी / कर्मचारी (खुद्द आणि क्षेत्रीय) यांना दिनांक ०१ एप्रिल, २०२४ पासून त्यांचे सर्व रजेचे अर्ज HRMS प्रणालीमार्फतच सादर करण्याच्या सूचना द्याव्यात. तसेच सर्व विभागांनी त्यांच्या अधीनस्थ सर्व अधिकारी / कर्मचारी यांचे रजा लेखे अद्ययावत ठेवावेत. कोणतेही रजेचे अर्ज ऑफलाईन घेण्यात येणार नाही.

हे पण वाचा ~  7th pay commission : सातव्या वेतन आयोगानुसार या सरकारच कर्मचाऱ्यांना लागू होणार कालबध्द पदोन्नती योजना ! वेतनश्रेणीबाबत परिपत्रक निर्गमित ..

सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संगणक संकेतांक २०२४०३२८१२३८१८२४०७ असा आहे. हे परिपत्रक डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don't Copy!!