HRA Hike : महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता (DA) आणि घरभाडे भत्ता (HRA) मध्ये वाढ होणार आहे. ही वाढ कर्मचाऱ्यांच्या पगारात लक्षणीय वाढ करणार आहे.सर्व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ पगारावर जुलै 2024 पासून 53% दराने DA मिळणार आहे.
DA Hike Updates (महागाई भत्ता वाढ)
- सध्याचा DA दर : 50%
- नवीन DA दर : जुलै 2024 पासून 53% लागू
- वाढीचा दर : 3%
शहरांचे वर्गीकरण | सध्याचा HRA दर | नवीन HRA दर | वाढीचा दर |
---|---|---|---|
X वर्ग शहरे | 27% | 30% | 3% |
Y वर्ग शहरे | 18% | 20% | 2% |
Z वर्ग शहरे | 9% | 10% | 1% |
घरभाडे भत्ता (HRA) वाढ
सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार, जेव्हा DA 50% पेक्षा जास्त होतो,तेव्हा घरभाडे भत्ता (HRA) मध्ये देखील वाढ होते. या वाढीचे तपशील खालीलप्रमाणे असणार आहे.
HRA वाढीचा प्रभाव
- X वर्ग शहरे (मुंबई,पुणे इ.) : 27% वरून 30% पर्यंत HRA वाढ
- Y वर्ग शहरे (नाशिक,औरंगाबाद इ.) : 18% वरून 20% पर्यंत HRA वाढ
- Z वर्ग शहरे (इतर छोटी शहरे) : 9% वरून 10% पर्यंत HRA वाढ
DA वाढही जुलै 2024 पासून झाली असून HRA वाढ देखील जुलै 2024 पासून लागू होणार आहे.घरभाडे भत्ता (HRA) हा X, Y, Z वर्ग शहरांनुसार अनुक्रमे 3%, 2%, आणि 1% वाढणार आहे.
उदाहरण
समजा, एका कर्मचाऱ्याचा मूळ पगार ₹50,000 आहे आणि तो X वर्ग शहरात (मुंबई) राहतो तर…
- सध्याचा DA (50%) : ₹25,000
- नवीन DA (53%) : ₹26,500 (₹1,500 वाढ)
- सध्याचा HRA (27%) : ₹13,500
- नवीन HRA (30%) : ₹15,000 (₹1,500 वाढ)
- एकूण पगारातील वाढ : ₹3,000 (DA + HRA वाढ)