HRA Calculator : सातव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्र शासनाने केंद्रिय कर्मचाऱ्यांना लागू केलेल्या वेतन मॅट्रीक्स व वेतन स्तर या धर्तीवर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारीत वेतन) नियम, २०१९, अन्वये वेतन मॅट्रीक्स व वेतन स्तर लागू केले आहे.
शासकीय कर्मचाऱ्यांना 7 व्या वेतन आयोगाच्या कालावधीत दि.07 जुलै, 2017 च्या आदेशाद्वारे सुधारीत दराने घरभाडे भत्ता (HRA Calculator) अनुज्ञेय करण्यात आला आहे.
HRA Hike Calculator
राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र कर्मचारी यांना घरभाडे भत्ता मंजूर करण्यासाठी शहरांचे/गावांचे शासन निर्णय वित्त विभाग दिनांक १६.१२.२०१६ अन्वये यापूर्वीच पुर्नवर्गीकरण करण्यात आलेले आहे. सदर बदललेले / सुधारीत वर्गीकरण विचारात घेऊन, संबंधित शहरांना / गावांना, त्यांच्यासमोर स्तंभ-४ मध्ये दर्शविल्यानुसार ७ व्या वेतन आयोगातील सुधारीत वेतनश्रेणीच्या आधारे सुधारीत दराने घरभाडे भत्ता मंजूर करण्यात येईल.
महागाई भत्ता व फरक किती मिळणार ? येथे चेक करा ➡️ DA Calculator
मित्रांनो,X, Y आणि Z वर्गीकृत शहरांना अनुक्रमे किमान रु.५४००, रु.३६०० व रु.१८०० इतका घरभाडे भत्ता अनुज्ञेय राहील. ज्यावेळी सातव्या वेतन आयोगानुसार अनुज्ञेय केलेला महागाई भत्ता हा २५ टक्क्याची मर्यादा ओलांडेल त्यावेळी वरीलप्रमाणे वर्गीकृत शहरांना अनुक्रमे २७%, १८% व ९% दराने घरभाडे भत्ता मंजूर करण्यात येतो.
घरभाडे भत्ता वाढ कॅल्क्युलेटर
सातव्या वेतन आयोगानुसार मिळणारी महागाई भत्त्याची रक्कम ही ५० टक्क्यापेक्षा अधिक होईल त्यावेळी वरीलप्रमाणे वर्गीकृत शहरांना, अनुक्रमे ३०%, २०% व १० % अशा वाढीव दराने, घरभाडे भत्ता मंजूर करण्यात येणार आहे.
घरभाडे भत्ता वाढ हा अनुदानप्राप्त संस्था व जिल्हा परिषदा यांच्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत घरभाडेगत्त्यावरील खर्च संबंधित प्रमुख लेखाशिर्षाखाली,ज्या उपलेखाशिर्षाखाली त्यांच्या सहायक अनुदानाचा खर्च खर्ची टाकण्यात येतो. त्या उपलेखाशिर्षाखाली खर्ची टाकण्यात येणार आहे.
स्थानिक पुरक भत्ता व वाहतूक भत्ता हे दोन्ही भत्ते हे ६ व्या वेतन आयोगाच्या कालावधीत, ज्या दराने अदा करण्यात येत होते, त्याच दराने अदा करण्यात येईल.