Home Loans and Advances : सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाकरीता, वित्त विभागाच्या परिपत्रकान्वये सन २०२४-२०२५ या आर्थिक वर्षाच्या प्रथम नऊमाहीकरीता (डिसेंबर, २०२४ अखेर) आवश्यक असणारा अनिवार्य व कार्यक्रमांतर्गत खर्चाचा अर्थसंकल्पीत निधी एकूण वार्षिक तरतूदीच्या ६० व ७० टक्केच्या मर्यादेत वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
वित्त विभागाने ५५-गृहनिर्माणासाठी कर्जे व आगाऊ रकमा या उद्दीष्टासाठी एकूण वार्षिक तरतूदीच्या १०० टक्के निधी बीम्स प्रणालीवर वितरीत केला आहे.
Home Loans and Advances for Housing
नियंत्रक, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली यांनी उपरोक्त संदर्भ क्र. ५ च्या पत्रान्वये कृषि विद्यापीठांच्या कर्मचाऱ्यांना घर बांधणी अग्रीम (अनिवार्य) ६२१६ ०२०१, ५५- कर्जे व आगाऊ रकमा करीता मंजूर अर्थसंकल्पीय तरतुदीतून निधी वितरीत करण्याबाबत निधी वितरणाचा प्रस्ताव सादर केलेला आहे.डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली या कृषि विद्यापीठाला कृषि विद्यापीठांच्या कर्मचाऱ्यांना घर बांधणी अग्रीमा करीता (६२१६ ०२०१) अंतर्गत निधी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाकरीता, मागणी क्र. डी-११, ६२१६-गृहनिर्माणासाठी कर्जे, ८०-सर्वसाधारण, ८०० इतर कर्जे, (००) (०१) कृषि विद्यापीठांच्या कर्मचाऱ्यांना घर बांधणी अग्रीम (अनिवार्य) ६२१६ ०२०१, ५५- कर्जे व आगाऊ रकमा या लेखाशिर्षांतर्गत एकूण रु.२४८.४१ लाख (अक्षरी रुपये दोन कोटी, अड्ठेचाळीस लाख, एक्केचाळीस हजार फक्त) अनुदान पुढीलप्रमाणे वितरीत करण्यास शासन मंजुरी देण्यात आली आहे.
गृहनिर्माण कर्ज व आगाऊ अग्रीम
१) सदरचे निधी वितरण खालील नमूद अटी व शर्तीच्या अधीन राहून शासन मंजुरी देत आहे. वित्त विभागाच्या दि.०१.०४.२०२४ व दि.२५.०७.२०२४ च्या परिपत्रकामध्ये देण्यात आलेल्या सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी.
२) कृषि विद्यापीठांनी उपलेखाशिर्ष / गट / योजना आणि बाबनिहाय वितरीत केलेला निधी संबंधीत योजनेतील जी पदे / बाबी, योजनेतर योजना म्हणून पुढे चालू ठेवण्यास शासनाने मान्यता दिली आहे, त्या पदांचे वेतन व भत्ते आणि अनुज्ञेय बाबींसाठीच फक्त खर्च करावा.
३) उपलेखाशिर्षनिहाय, गटनिहाय, योजनानिहाय व बाबनिहाय वितरीत केलेला निधी कोणत्याही कारणास्तव अखर्चित / शिल्लक राहीला / राहणार असेल तर सदर अखर्चित / शिल्लक निधी शासनाचे मान्यतेशिवाय इतर गटांसाठी / योजनांसाठी / बाबींसाठी परस्पर वर्ग करु नये किंवा खर्च करु नये.
४) प्रत्येक उपलेखाशीर्ष / गट/योजना आणि बाब निहाय स्वतंत्र लेखे / हिशोब ठेवावेत.
५) कृषि विद्यापीठांना मंजूर केलेले सहाय्यक अनुदान, अनुदान सुत्राप्रमाणे बरोबर आहे किंवा कसे, तसेच, विहीत आदेश / कार्यपध्दतीनुसार खर्च करण्यात येत आहे किंवा कसे, याबाबत प्रत्येक आर्थिक वर्षाचा मुल्यमापन अहवाल शासनास संबंधित आर्थिक वर्ष समाप्त झाल्यापासून तीन महिन्यांच्या कालावधीत सादर करावा, तसेच, मागील आर्थिक वर्षाचा अखर्चित निधी किती आहे, हे तात्काळ शासनास कळवावे.
६) विद्यापीठांना मंजूर करण्यात आलेले अनुदान महाराष्ट्र कृषि विद्यापीठ अधिनियम १९८३, महाराष्ट्र कृषि विद्यापीठ परिनियम १९९०, आणि महाराष्ट्र कृषि विद्यापीठ लेखा संहिता १९९१
३. विद्यापीठाच्या नियंत्रक आणि इतर संबंधित सक्षम प्राधिकाऱ्यांनी उपरोक्त अटी व शर्तीचे काटेकोरपणे अनुपालन करावे.
४. सहायक लेखाधिकारी, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली या आहरण व संवितरण अधिकारी यांनी संबंधित उपशीर्षांतर्गत मंजूर केलेले अनुदान कृषि विद्यापीठाचे नियंत्रक यांना अदा करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी.
५. याप्रित्यर्थचा खर्च सन २५-२०२४च्या अंदाजपत्रकात नमूद केलेल्या लेखाशीर्षाखाली मंजूर केलेल्या तरतुदीतून मासिक निधी विवरणपत्राच्या मर्यादेत भागवावा व त्याच लेखाशिर्षाखाली खर्ची टाकण्यात यावा.