Home loan EMI : नोकरी लागल्यानंतर बहुतेक पगारदार व्यक्ती स्वतःचे घर बांधण्याचे स्वप्न पाहतात. स्वतःचे घर असणे ही प्रत्येकाची इच्छा असते. परंतु, घरांच्या वाढत्या किमतीमुळे केवळ बचतीच्या पैशांमधून घर खरेदी करणे आता अवघड झाले आहे. विशेषतः पगारदार व्यक्तींसाठी, महागाईच्या या काळात बचतीच्या पैशांमधून घर खरेदी करणे जवळजवळ अशक्य आहे.
Home loan EMI Calculator
अलीकडील काही वर्षांमध्ये गृह कर्ज घेणाऱ्यांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे. पण तुम्ही कधी विचार केला आहे का,की ज्या व्यक्तीचा पगार महिन्याला फक्त 20 हजार रुपये आहे, त्याला किती लाखांचे गृह कर्ज मिळू शकते? नक्कीच नाही! तर चला, आज आपण या विषयावर संपूर्ण माहिती घेणार आहोत.
20 हजार पगार असलेल्यांना गृह कर्ज मिळेल का?
महिन्याला 20 हजार रुपये कमावणाऱ्या व्यक्तींनाही बँका गृह कर्ज देतात. परंतु, यासाठी त्या व्यक्तीचा सिबिल स्कोर चांगला असणे आवश्यक आहे आणि त्याकडे उत्पन्नाचे पुरावे असले पाहिजेत. बँका कमी पगार असलेल्या व्यक्तींना कमी प्रमाणात कर्ज देतात. त्यामुळे, अशा व्यक्तींनी आपल्या बजेटनुसार घराची निवड करावी.
जर 20,000 रुपये पगार असलेल्या व्यक्तीने 20 वर्षांच्या कालावधीसाठी गृह कर्ज घ्यायचे ठरवले, तर त्याला साधारणपणे 10 ते 15 लाख रुपयांचे गृह कर्ज मिळू शकते. बँका पगारदार व्यक्तीच्या पगाराच्या 50 ते 60% रक्कम EMI म्हणून बाजूला काढण्यास सांगतात. म्हणजेच, जर एखाद्या व्यक्तीला 10 ते 15 लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाले, तर त्याला दरमहा 10,000 ते 12,000 रुपये EMI भरावे लागू शकतात.
Cibil Score and Home loan
बँका गृह कर्ज देण्यापूर्वी त्या व्यक्तीवर आधीपासूनच कोणतेही कर्ज आहे का, याची तपासणी करतात. तसेच, त्यांचा “सिबिल स्कोर ” काळजीपूर्वक तपासला जातो. सिबिल स्कोर 300 ते 900 दरम्यान असतो. जर सिबिल स्कोर 750 पेक्षा जास्त असेल, तर तो चांगला समजला जातो. ज्या व्यक्तींचा सिबिल स्कोर 800 च्या आसपास असतो, त्यांना सहजतेने कर्ज मंजूर होते.
10 लाख रुपयांच्या गृह कर्जाचा EMI किती असेल?
जर तुम्ही 10 लाख रुपयांचे गृह कर्ज 20 वर्षांच्या कालावधीसाठी 8% व्याजदराने घेतले, तर तुम्हाला दरमहा 8,364 रुपये हप्ता भरावा लागेल. या कर्जाच्या कालावधीत तुम्हाला एकूण 20 लाख 7,456 रुपये बँकेला परत करावे लागतील.यात 10 लाख रुपये मुद्दल आणि 10 लाख 7,456 रुपये व्याज असेल. याशिवाय, प्रोसेसिंग फी आणि इतर शुल्क वेगळे लागू शकते.
15 लाख रुपयांच्या गृह कर्जाचा EMI किती असेल?
जर तुम्ही 15 लाख रुपयांचे गृह कर्ज 20 वर्षांच्या कालावधीसाठी 8.5% व्याजदराने घेतले, तर तुम्हाला दरमहा 13,017 रुपये EMI भरावे लागेल. या कर्जाच्या कालावधीत तुम्हाला एकूण 31 लाख 24,164 रुपये बँकेला परत करावे लागतील. यात 15 लाख रुपये मुद्दल आणि 16 लाख 24,164 रुपये व्याज असेल.गृह कर्ज घेण्यापूर्वी बँकेच्या अटी आणि शुल्क यांची चांगली माहिती घेणे आवश्यक आहे.