Close Visit Mhshetkari

Home loan Charges : गृहकर्जासोबत बँका कोणकोणते चार्जेस वसूल करतात ? माहिती घेतलीत तर राहाल फायद्यात!

Home loan Charges : नमस्कार मित्रांनो,घर हे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचे स्वप्न असते. अनेकजण यासाठी गृहकर्जाचा पर्याय निवडतात. पण गृहकर्ज घेताना काही गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे. बँका गृहकर्जासोबत अनेक प्रकारचे चार्जेस आकारतात, ज्याबद्दल माहिती असणे गरजेचे आहे.

Home loan Hidden Charges

Processing fees :- गृहकर्जासाठी अर्ज करताना बँक किंवा वित्तीय संस्था एक प्रोसेसिंग फी आकारतात. ही फी परत करण्यायोग्य नसते, त्यामुळे कर्ज मंजूर झालं नाही तरी ती वाया जाते. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी बँकेची निवड काळजीपूर्वक करा.

Mortgages Deed fees – :- Home loan घेताना मालमत्तेच्या मालकी हक्काची नोंद करण्यासाठी ही फी आकारली जाते. ही एक मोठी रक्कम असू शकते, जी कर्जाच्या रकमेच्या काही टक्के असते. काही बँका ही फी माफ करतात.

Legal fees : बँक किंवा वित्तीय संस्था मालमत्तेच्या कायदेशीर स्थितीची तपासणी करण्यासाठी वकिलांची मदत घेतात. यासाठी लागणारी फी ग्राहकांकडून वसूल केली जाते. जर मालमत्तेला संस्थेने कायदेशीर मान्यता दिली असेल, तर ही फी लागू होत नाही.

Commitment Fees : कर्ज मंजूर झाल्यानंतर काहीवेळा ठराविक वेळेत कर्ज न घेतल्यास बँक कमिटमेंट फी आकारते. हे शुल्क अवितरित कर्जावर आकारलं जाते.

हे पण वाचा ~  Car Insurance : कारविमा घेताना कोणत्या बाबी लक्षात घ्याव्यात ? पहा प्रकार फायदे सविस्तर माहिती...

Pre-payment penalty : जर तुम्ही कर्जाची मुदत पूर्ण होण्याआधीच त्याची परतफेड केली, तर काही बँका प्रीपेमेंट पेनल्टी आकारतात. वेगवेगळ्या बँकांमध्ये हे शुल्क वेगवेगळे असते.काही बँका हे शुल्क आकारत नाहीत.

Home loan other Charges

मित्रांनो बऱ्याच वेळा बँका इतर शुल्कं देखील आकारू शकते, जसे की डॉक्युमेंटेशन चार्जेस, व्हॅल्युएशन चार्जेस, इत्यादी. गृह कर्ज घेण्यापूर्वी त्या सर्व शुल्कांचा बँकेच्या प्रतिनिधीशी चर्चा करून योग्य निर्णय घ्यावा.

सूचना :- गृहकर्ज घेताना या सर्व चार्जेसबद्दल माहिती घेणं आवश्यक आहे. यामुळे तुम्हाला आर्थिक नियोजन करणं सोपं होईल आणि भविष्यात अडचणी टाळता येतील.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don't Copy!!