Home Loan : जर तुम्ही घर खरेदीसाठी “होम लोन” घेण्याचा विचार करत असाल, तर योग्य बँक आणि व्याजदर निवडणे हा सर्वात महत्त्वाचा पाया आहे. गृहकर्जावरील व्याजदर तुमच्या क्रेडिट स्कोअर, कर्जाची रक्कम आणि इतर घटकांवर अवलंबून असतो.
देशातील प्रमुख बँकांच्या व्याजदरांची तुलना करून तुम्ही सर्वात परवडत्या पर्यायाची निवड करू शकता. आज आपण देशातील “सर्वात कमी व्याजदर” देणाऱ्या टॉप 5 बँकांची माहिती घेणार आहोत.
Low Home Loan Interest Rates Top 5 Banks
देशातील सर्वात कमी व्याजदर देणाऱ्या टॉप 5 बँका
UCO Bank :- सदरील बँकेचे गृह कर्जाचे व्याजदर 8.30% पासून सुरुवात होते.UCO बँक देशातील सर्वात कमी व्याजदरात गृहकर्ज देते. ही बँक सरकारी आहे आणि विश्वासार्ह मानली जाते.
युनियन बँक ऑफ इंडिया :- या बँकेत गृह कर्जाचे व्याजदर 8.30% ते 10.90% असून युनियन बँक सुद्धा कमी व्याजदरात गृहकर्ज देते. तुमच्या कर्जाच्या रकमेनुसार व्याजदर बदलू शकतो.
बँक ऑफ इंडिया :- सरकारी बँक व्याजदर 8.35% ते 11.10% असून तिची शाखा संपूर्ण देशात आहे.
बँक ऑफ बडोदा :- बँक ऑफ बडोदा ही देखील कमी व्याजदरात गृहकर्ज व्याजदर देणारी प्रमुख बँक असून 8.40% ते 10.65% दराने गृह कर्ज देते.
पंजाब नॅशनल बँक (PNB) :- या बँकेत व्याजदर 8.40% ते 10.25% असून PNB ही देशातील सर्वात जुनी आणि विश्वासार्ह बँक आहे.
Other Banks home loan Interest Rate
- स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) :- 8.50% ते 9.85%
- कॅनरा बँक :- 8.40% ते 11.25%
- सिटी युनियन बँक :- 8.25% ते 10.50%
- कोटक महिंद्रा बँक :- 8.75% पासून
- आयसीआयसीआय बँक : 8.75% पासून
गृहकर्ज खाजगी बँक व्याजदर
- एलआयसी हाऊसिंग फायनान्स : 8.50% पासून
- बजाज हाऊसिंग फायनान्स : 8.50% पासून
- टाटा कॅपिटल : 8.75% पासून
- पीएनबी हाऊसिंग फायनान्स : 8.50% ते 14.50%