Group Insurance : राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना, १९८२ अंतर्गत दिनांक १ जानेवारी, २०२४ ते दिनांक ३१ डिसेंबर, २०२४ या वर्षात सदस्यत्व संपुष्टात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना देय होणाऱ्या बचत निधीचे लाभ प्रदान करण्यासाठी परिगणितीय तक्ता संदर्भाधीन क्र.६ च्या शासन निर्णयान्वये निर्गमित करण्यात आला होता.
राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना, १९८२ अंतर्गत माहे जानेवारी, २०२५ ते माहे डिसेंबर, २०२५ या वर्षामध्ये सदस्यत्व संपुष्टात आल्यास देय होणाऱ्या बचत निधीचे लाभ प्रदान करण्यासाठीचा परिगणतीय तक्ता निर्गमित करणे शासनाच्या विचाराधीन होते.
Employee Group Insurance Calculator
राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना, १९८२ अंतर्गत दिनांक १ जानेवारी, २०२५ ते दिनांक ३१ डिसेंबर, २०२५ या कालावधीत योजनेचे सभासदत्व संपुष्टात येणाऱ्या कर्मचाऱ्यांस बचत निधीचे लाभ प्रदान करण्यासाठी परिगणतीय तक्ता सोबत जोडला आहे. सदर तक्त्यात दर्शविल्याप्रमाणे प्रति युनिटकरिता बचत निधीची संचित रक्कम प्रदान करण्यात येणार आहे.
मंत्रालयातील सर्व विभाग तसेच मंत्रालयीन विभागांच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील विभाग प्रमुख/कार्यालय प्रमुखांनी दिनांक १ जानेवारी, २०२५ पासून राजीनामा, सेवानिवृत्ती किंवा सेवेत असताना मृत्यू पावल्याने व इतर काही कारणाने गट विमा योजनेचे सभासदत्व संपुष्टात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना/कर्मचाऱ्यांच्या वारसांना सोबतच्या तक्त्यानुसार देय होणारी बचत निधीची रक्कम प्रदान करण्यात येणार आहे.
राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना
१९८२ च्या नियमानुसार बचत निधीमधील शिल्लक रकमांवर दरसाल विहित दराने (तिमाही चक्रवाढ होणारे) व्याज देण्याबाबत तरतूद आहे.
राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना, १९८२ च्या बचत निधीमधील संचित रकमांवर दि.०१ जानेवारी, २०२५ पासून दर साल दर शेकडा ७.१ टक्के दराने (तिमाही चक्रवाढ होणारे) व्याज आकारण्यात आले आहे. राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना, १९८२ च्या विमा निधीमधील संचित रकमांवर दर साल दर शेकडा ४ टक्के दरात कोणताही बदल झालेला नसल्यामुळे याच दराने विमा निधीमधील संचित रकमांवर व्याजाची आकारणी करण्यात यावी.
सोबतचा परिगणितीय तक्ता संचालक, लेखा व कोषागारे संचालनालयाचे पत्र क्र.संलेको/गवियो/२०२५/परिगणतीय तक्ते/१०/०७/३०९ दिनांक २० जानेवारी, २०२५ अन्वये उपलब्ध करुन देण्यात आलेल्या परिगणनेनुसार निर्गमित केला आहे.