Gratuity Money Alert : ग्रॅच्युइटी ही कर्मचाऱ्याला कंपनीत दीर्घकाळ काम केल्याबद्दल मिळणारे बक्षीस असते.ग्रॅच्युइटी कायदा, 1972 अंतर्गत, कर्माचाऱ्याने सलग 5 वर्षांपर्यंत काम केल्यानंतर ग्रॅच्युइटी मिळते.
कर्मचाऱ्यांच्या ग्रॅच्युइटी मर्यादेत महत्त्वपूर्ण बदल केला आहे.केंद्रीय मंत्रिमंडळाने करमुक्त ग्रॅच्युईटीची मर्यादा 20 लाख रुपयांवरून 25 लाख रुपये केली आहे.आता या रकमेपर्यंतच्या ग्रॅच्युइटीवर कोणताही कर लागणार नाही.
केंद्र सरकारने 2019 मध्ये करमुक्त ग्रॅच्युइटीची मर्यादा 10 लाखांवरून 20 लाख रुपये केली होती.आता 20 लाख रुपयांवरून 25 लाख रुपये केली आहे मात्र, तुमच्या पगारावर किती ग्रॅच्युइटी मिळेल याविषयी सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत.
ग्रॅच्युईटी कशी मोजली जाते ?
शेवटचा पगार मूळ वेतन + महागाई भत्ता + विक्रीवर मिळणारे कमिशन (असल्यास). या सूत्रात महिन्यातील 26 कामाचे दिवस गृहीत धरून 15 दिवसांची सरासरी मोजून कर्मचाऱ्याला पगार दिला जातो.
नोकरीचा कालावधी : नोकरीच्या शेवटच्या वर्षात 6 महिन्यांपेक्षा जास्त काळ चालणारी कोणतीही नोकरी पूर्ण वर्ष मानली जाईल,
उदाहरणार्थ, 6 वर्षे 8 महिने काम करण्याच्या बाबतीत ती 7 वर्षे मानली जाईल.
उदाहरण 1) समजा एखाद्याने एखाद्या कंपनीत 6 वर्षे 8 महिने काम केले. नोकरी सोडताना त्यांचा मूळ पगार दरमहा 15 हजार रुपये होता.अशा परिस्थितीत सूत्रानुसार त्यांची ग्रॅच्युइटीची रक्कम पुढीलप्रमाणे मोजली जाईल.
15000x7x15÷26= 60 हजार 577 रुपये
उदाहरण 2) समजा एखाद्याने एखाद्या कंपनीत 14 वर्षे 9 महिने काम केले. नोकरी सोडताना त्यांचा मूळ पगार दरमहा 60 हजार रुपये होता.अशा परिस्थितीत सूत्रानुसार त्यांची ग्रॅच्युइटीची रक्कम पुढीलप्रमाणे मोजली जाईल.
60,000×15×15÷26= 5 लाख 19 हजार 230 रुपये
ग्रॅच्युइटी मिळण्यासाठी पात्रता (Gratuity Money)
- कर्मचाऱ्याने एकाच कंपनीत किमान 5 वर्षे काम केलेले असावे.
- कर्मचारी सेवानिवृत्त झाला असावा, राजीनामा दिला असावा किंवा अपंगत्व किंवा मृत्यूमुळे नोकरी सोडली असावी.
- जर कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला, तर त्याच्या नॉमिनीला ग्रॅच्युइटी मिळते.