Gratuity hike : नमस्कार मित्रांनो, आपल्याला माहिती असेल की, सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय आज निर्गमित करण्यात आलेला आहे,ज्यामध्ये ग्रॅच्युइटी रकमेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामध्ये दिनांक १.११.२००५ रोजी किंवा त्यानंतर नियुक्त झालेल्या DCPS/NPS लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना वित्त विभागाच्या दिनांक ३१.०३.२०२३ च्या शासन निर्णयातील तरतूदी लागू करण्यात आलेले आहे. ज्यामध्ये पुढील बाबींचा समावेश आहे.
कुटुंब निवृत्ती व रुग्णता निवृत्तीवेतन लागू
(अ) कर्मचाऱ्याचा सेवेत असतांना मृत्यु झाल्यास त्याच्या कुटुंबाला कुटुंब निवृत्तीवेतन आणि मृत्यु उपदान लाभ घेता येईल.
(ब) रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्तिवेतन आणि सेवानिवृत्ती उपदान लागू करण्यात येत आहे.
(क) सदर कुटुंब निवृत्तीवेतनधारकास व रुग्णता निवृत्तीवेतनधारकास महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम १९८२ मधील तरतूदीप्रमाणे कुटुंब निवृत्तिवेतन / रुग्णता निवृत्तिवेतन लागू होईल.
Family pension and gratuity
प्राधिकरणाच्या सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान लागू करण्यात येणार आहे.
सेवानिवृत्ती उपदान व मृत्यु उपदानाच्या प्रयोजनार्थ सद्यःस्थितीत महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम १९८२ मधील तरतूदी लागू करण्यात आली आहे.
वित्त विभागाने संदर्भाधीन दिनांक २९.०९.२०१८ च्या शासन निर्णयान्वये लागू केलेली सानुग्रह अनुदान योजना प्राधिकरणातील कर्मचाऱ्यांना लागू असणार नाही.
आता दिनांक १.११.२००५ ते या शासन निर्णयाच्या दिनांकापर्यंत मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबास मृत्यु उपदान, कुटुंब निवृत्तीवेतनाची थकबाकी तसेच नियमित कुटुंब निवृत्तीवेतन मिळण्यासाठी सदर शासन निर्णयासोबतचा नमुना- ३ मधील विकल्प कार्यालय प्रमुखाकडे सादर करण्यात आलेला आहे.
कुटुंब निवृत्तीवेतनधारकास त्याला मिळालेल्या सानुग्रह अनुदानाची रक्कम DCPD /NPS अंतर्गत शासनाच्या अंशदानाची व्याज/लाभांसह रक्कम समायोजित करण्याच्या अटीवर कुटुंब निवृत्तीवेतनाचा लाभ अनुज्ञेय करण्यात आला आहे.सदर रक्कम समायोजित झाल्यानंतर कुटुंब निवृत्तीवेतनधारकास नियमितपणे कुटुंब निवृत्तीवेतन अनुज्ञेय राहणार आहे.
Gratuity Amount Hike
सरकारी कर्मचाऱ्यांकडून मृत्यू उपदान व ग्रॅच्युइटी रकमेत वाढ करण्यात यावी अशी अनेक दिवसापासून मागणी करण्यात येत होती. विधानसभेच्या तोंडावर राज्य सरकारने कर्मचाऱ्यांची ही मागणी मान्य केली आहे.
आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर 14 लाख रुपये ऐवजी 20 लाख रुपये ग्रॅज्युटी मिळणार आहे.आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
मुख्यमंत्री @mieknathshinde यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis , उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.
मंत्रिमंडळ निर्णय खालीलप्रमाणे :… pic.twitter.com/94u11pRoSL
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) September 30, 2024
कोतवाल यांच्या मानधनात दहा टक्के वाढ करण्यात आलेली आहे. अनुकंप भरती कोतवाल संवर्गासाठी लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सुद्धा आज घेण्यात आला.अंगणवाडी सेविका यांच्या मानधनात सुद्धा पाच हजार रुपयांची वाढ आजच्या बैठकीत करण्यात आलेली आहे.