Gratuity Family Pension : परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्याचा सेवा कालावधीत मृत्यु झाल्यास त्याच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्तिवेतन आणि मृत्यु उपदान, रूग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्तिवेतन आणि सेवानिवृत्ती उपदान तसेच, विद्यापीठ सेवेतून निवृत्त झालेल्या/होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान अनुज्ञेय करण्याच्या अनुषंगाने कार्यपध्दती संदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
Gratuity and Family Pension
कृषि व पदुम विभाग शासन निर्णय दिनांक २१/०६/२०२३ अन्वये परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना/राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्याचा सेवा कालावधीत, मृत्यु झाल्यास त्याच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्तिवेतन आणि मृत्यु उपदान,रूग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्तिवेतन आणि सेवानिवृत्ती उपदान तसेच विद्यापीठ सेवेतून निवृत्त झालेल्या/होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदानाचा लाभ अनुज्ञेय करण्यात आला आहे.
वित्त विभागाकडून वेळोवेळी देण्यात येणारे आदेश व सुधारणा लागू राहतील असे नमूद आहे.वित्त विभागाने शासन परिपत्रक क्रमाक रानिप्र-२०२३/प्र.क्र.५७/सेवा-४ दिनांक २४ ऑगस्ट २०२३ व शासन शुध्दीपत्रक क्र. रानिप्र-२०२३/प्र.क्र.५७/सेवा-४ दि. २० नोव्हेंबर, २०२३ अन्वये याबाबतची कार्यपध्दती निश्चित केली आहे.
कृषी व पदुम विभागाच्या संदर्भीय शासन निर्णयास अनुसरून परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना/राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत असलेल्या कर्मचाऱ्याच्या मृत्युपश्चात त्याचे कुटुंबाने संदर्भाधीन शासन निर्णयासोबतच्या नमुना ३ अन्वये महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम १९८२ प्रमाणे कुटुंबनिवृत्तिवेतनाचा लाभ मिळण्याबाबतच्या विकल्पाची निवड केली असल्यास त्या अनुषंगाने कुटुंब निवृत्तिवेतन आणि मृत्यु उपदान अनुज्ञेय करण्यासाठी सोबत जोडलेल्या परिशिष्ट-१ प्रमाणे कार्यवाही करण्यात येणार आहे.
परिभाषित अंशदान निवृतिवेतन योजना/राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत रुग्णता निवृत्त झालेला कर्मचारी महाराष्ट्र नागरी (निवृत्तिवेतन) नियम, १९८२ अंतर्गत रूग्णता निवृत्तिवेतन मिळण्यास पात्र ठरत असल्यास व सदर कर्मचाऱ्याने संदर्भाधीन शासन निर्णयास अनुसरून रुग्णता निवृत्तिवेतन अनुज्ञेय करणे, या विकल्पाची (नमुना ३ नुसार) निवड केली असल्यास त्यानुषंगाने रूग्णता निवृत्त निवृत्तीवेतन आणि सेवानिवृत्ती उपदान अनुज्ञेय करण्यासाठी सोबत जोडलेल्या परिशिष्ट-२ प्रमाणे कार्यवाही करण्यात यावी.
रूग्णता / कुटुंब निवृत्तिवेतन आणि सेवानिवृत्ती/मृत्यु उपदान
परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना/राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत सेवेत असलेल्या कर्मचाऱ्याने संदर्भाधीन शासन निर्णयास अनुसरून त्यासोबत नमुना-२ अन्वये महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम १९८२ प्रमाणे रूग्णता निवृत्तीवेतन/कुटुंब निवृत्तिवेतनाचा लाभ मिळण्याबाबतच्या विकल्पाची निवड केली असल्यास त्यानुषंगाने रूग्णता निवृत्तीवेतन / कुटुंब निवृत्तिवेतन आणि सेवानिवृत्ती उपदान/मृत्यु उपदान अनुज्ञेय करण्यासाठी सोबत जोडलेल्या परिशिष्ट-३ प्रमाणे कार्यवाही करण्यात येईल.
शासन निर्णय दिनांक २१/०६/२०२३ नुसार कार्यरत असणाऱ्या ज्या विद्यापीठ कर्मचाऱ्याने त्याचा सेवेत असताना मृत्यु झाल्यास किंवा तो रूग्णता सेवानिवृत झाल्यास यथास्थिती त्याच्या कुटुंबाला कुटुंब निवृत्तीवेतन/त्याला रूग्णता निवृत्तीवेतन अनुज्ञेय करण्याचा विकल्प नमुना-२ मध्ये सादर केला आहे, अशा कर्मचाऱ्याला तो सेवानिवृत होईपर्यंत सदरचा विकल्प बदलण्याची मुभा देण्यात आली आहे.
कर्मचाऱ्याने वेळोवेळी सादर केलेल्या विकल्पाची नोंद कार्यालय प्रमुखाने कर्मचाऱ्याच्या सेवापुस्तकात तत्परतेने घ्यावी, तसेच सदर विकल्पाची व त्याची नोंद घेतलेल्या सेवापुस्तकाच्या पानाची साक्षांकित सत्यप्रत नियंत्रक (वित्त व लेखा) महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर यांचे मार्फत केंद्रीय अभिलेख देखभाल अभिकरण (CRA- Protean) यांचे कडे पाठवावी. विकल्प देणे हा कर्मचाऱ्याचा अधिकार असल्यामुळे कर्मचाऱ्याने तो हयात असताना दिलेला विकल्प, त्याच्या मृत्युपश्चात त्याच्या कुंटुबियांना कोणत्याही परिस्थितीत बदलता येणार नाही.
महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम १९८२ मधील नियम १३२ मध्ये नमूद केल्यानुसार “शासनाला येणे असलेल्या रकमा” प्रथमतः सेवानिवृत्ती उपदान/मृत्यु उपदान यामधून वसुल करण्यात याव्यात.
विद्यापीठ सेवेतून निवृत झालेल्या/होणाऱ्या कर्मचान्यांचा सेवानिवृत्ती उपदानाचा प्रस्ताव सोबतच्या नमुन्यात (Form-l) परिपूर्ण भरून मूळ सेवापुस्तकासह उपदानाच्या मंजूरीसाठी कुलसचिव, मपमविवि, नागपूर कार्यालयास सादर करण्यात येईल.
कुलसचिव, मपमविवि, नागपूर कार्यालयाकडून प्रचलित पध्दतीने प्रकरण मंजुर झाल्यानंतर उपदान अदा करण्याबाबत प्राधीकरण आदेश निर्गमीत करण्यासाठी नियंत्रक (वित्त व लेखा) यांचेकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवावे.