Ghibli Art Image : OpenAI ने अलीकडे ChatGPT च्या वापरकर्त्यांसाठी प्रतिमा निर्मिती (AI Image Generation) सुरू केली आहे.
आता कोणीही Studio Ghibli सारख्या जपानी ॲनिमे शैलीत आपल्या प्रतिमा रूपांतरित करू शकतो. मित्रांनो यापूर्वी फक्त ChatGPT Plus, Team, आणि Enterprise सदस्यांसाठी सदरील सुविधा उपलब्ध होती,परंतु आता सर्वांसाठी ऍक्सेसिबल आहे.
Ghibli Art AI प्रतिमा म्हणजे काय?
Studio Ghibli हे जपानचे प्रसिद्ध ॲनिमेशन स्टुडिओ आहे. यांनी My Neighbor Totoro, Spirited Away, Princess Mononoke सारखे जगप्रसिद्ध चित्रपट निर्माण केले आहेत.
ChatGPT च्या DALL-E 3 आणि GPT-4o तंत्रज्ञानाच्या मदतीने आता वापरकर्ते त्यांच्या सामान्य फोटोंना या जादुई ॲनिमे-स्टाईलमध्ये रूपांतरित करू शकतात.
ChatGPT वर Ghibli इमेज कशी बनवावी ?
📌 ChatGPT वर लॉग इन करा. https://chat.openai.com/ वर जा किंवा ChatGPT मोबाइल ॲप उघडा.
- मोफत खात्यासाठी Google/Apple ID वापरून साइन इन करा.
- चॅटबॉक्सच्या खाली “+” बटणावर क्लिक करा. कॉम्प्युटर किंवा फोनमधून एखादी प्रतिमा निवडा (उदा., स्वतःचा फोटो, लँडस्केप, कार्टून इ.).
- ChatGPT ला खालील सूचना द्या, जसे की- “Convert this image into Studio Ghibli’s anime style.
- Ghiblify this picture with a fantasy background.
- Make this photo look like a scene from Spirited Away.
- ChatGPT काही सेकंदात तुमच्या इमेजचे Ghibli-स्टाईल आवृत्ती तयार करेल.
- डाउनलोड बटण वर क्लिक करून ती सेव्ह करा.
Ghibli -शैलीतील प्रतिमा तयार करण्याच्या टिप्स
✅हाय-रेझोल्यूशन इमेज वापरा कारण जितकी स्पष्ट प्रतिमा, तितका चांगला आउटपुट.
✅पार्श्वभूमीचे वर्णन जोडा– उदा.,”Add a magical forest like in Princess Mononoke.”
✅ मानवी चेहऱ्यांसाठी अधिक सुधारणा – “Make the face more anime-like with big expressive eyes.
ChatGPT इतर AI टूल्स पेक्षा श्रेष्ठ का?
फीचर | ChatGPT (DALL-E 3) | Google Gemini | Grok (xAI) |
---|---|---|---|
प्रतिमा गुणवत्ता | उच्च (Ghibli सारखी कला) | मध्यम | मूलभूत |
वापर सुलभता | सोपी प्रॉम्प्टिंग | जटिल | मर्यादित |
मोफत मर्यादा | 3/दिवस | 15/दिवस | 5/दिवस |
प्रतिमा संपादन | उपलब्ध | मर्यादित | नाही |
भाषा समर्थन | मराठी सह 50+ भाषा | मराठी सह 40+ भाषा | प्रामुख्याने इंग्रजी |
मर्यादा आणि समस्या
🔹मोफत वापरकर्ते फक्त 3 इमेज/दिवस बनवू शकतात.
🔹जास्त वापरामुळे High demand, try again later अशी एरर येऊ शकते.
🔹चेहऱ्याच्या तपशिलांमध्ये कमतरता असल्यामुळे काही वेळा AI हे डिटेल्स चुकीच्या पद्धतीने हँडल करते.
📢 जर मर्यादा संपली तर?
ChatGPT Plus ($20/महिना) घ्या – अनलिमिटेड प्रतिमा निर्मिती.
इतर AI टूल्स वापरा – Leonardo.AI, MidJourney, किंवा Bing Image Creator 🚀