Close Visit Mhshetkari

Free Uniform : शैक्षणिक …. शालेय विद्यार्थ्यांच्या गणवेशा संदर्भात नवीन शासन निर्णय; आता मिळणार एवढी रक्कम …

Free Uniform : केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इ.१ ली ते इ.८ वी मधील शिक्षण घेत असलेल्या सर्व मुली, अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील मुले तसेच दारिद्र्यरेषेखालील पालकांची मुले यांना मोफत गणवेश योजनेचा लाभ देण्यात येतो. 

Free School Uniform Scheme

सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षापासून प्रस्तुत योजनेचा लाभ दारिद्र्यरेषेवरील पालकांच्या मुलांनादेखील देण्याबाबतचा निर्णय दि.०६ जुलै, २०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये घेण्यात आला आहे. केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत मोफत गणवेश योजनेकरीता निर्धारित केलेल्या प्रति गणवेश रु.३००/- याप्रमाणे राज्य शासनाने सुध्दा दोन गणवेशाकरीता रु.६००/- प्रति विद्यार्थी रक्कम निश्चित केली आहे.

मोफत गणवेश योजनेप्रमाणेच शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इ.१ ली ते इ.८ वी मधील सर्व विद्यार्थ्यांना सन २०२३-२४ पासून दरवर्षी एक जोडी बुट व दोन जोडी पायमोजे यांचा लाभ शाळा व्यवस्थापन समितीमार्फत देण्यात येत आहे.प्रति विद्यार्थी रु.१७०/- इतकी रक्कम निश्चित करण्यात आली आहे.

मोफत गणवेश वाटप योजना निधी वितरीत

राज्य शासनाच्या मोफत गणवेश बुट व पायमोजे योजनेंतर्गत शासन निर्णय दि. १७ मे, २०२४ अन्वये रु.८५०० लक्ष इतका निधी वितरीत करण्यात आला आहे. तसेच, सदर योजनेच्या अंमलबजावणीकरीता एकूण रु.१४४,४८,०१,०८०/- इतका निधी आवश्यक असल्याचे महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेमार्फत कळविण्यात आले आहे.

हे पण वाचा ~  MCX Gold Rates : डोनाल्ड ट्रम्प यांचा एक निर्णय अन् भारतात सोन्याच्या दरात मोठी उसळी, सोने 90 हजारांच्या उंबरठ्यावर; पहा किती वाढणार सोने

सदर योजनेंतर्गत रु.५९,४८,०१,०८०/- इतका उर्वरित निधी उपलब्ध करुन देण्याची विनंती महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेमार्फत करण्यात आली आहे. सदरप्रमाणे निधी वितरणास मान्यता देण्याचा प्रस्ताव नियोजन विभागामार्फत वित्त विभागास सादर करण्यात आला होता. सदर प्रस्तावास नियोजन व वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेस अनुसरुन रु.५९,४८,०१,०८०/- इतका निधी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेस उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

सदर शासन निर्णय नियोजन विभागाने अनौपचारिक संदर्भ क्र. ५०७/१४७१, दि.३१ डिसेंबर, २०२४ तसेच, वित्त विभागाने अनौपचारिक संदर्भ क्र.८६/व्यय-५, दि.२८ जानेवारी, २०२५ अन्वये दिलेल्या निर्देशास अनुसरुन निर्गमित करण्यात येत आहे.

मोफत गणवेश बुट व पायमोजे वाटप

सदर योजनेच्या अंमलबजावणीकरीता वितरीत करण्यात येणारे अनुदान सशर्त अनुदान असून त्याकरीता शासन निर्णय दि.०६ जुलै, २०२३ मधील तरतूदी लागू राहतील.

सदर निधी केंद्र व राज्य शासनने वेळोवळी दिलेले निर्देश/आदेश/शासन निर्णय/परिपत्रक/सूचना यांना अनुसरुन विहित कालावधीत खर्च करण्याची दक्षता राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, चर्नी रोड, मुंबई यांनी घेण्यात यावी. तसेच, सदर निधी खर्च केल्यानंतर याबाबतचे उपयोगिता प्रमाणपत्र शासनास सादर करावे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don't Copy!!