Festival Advance : नमस्कार मित्रांनो, आपल्याला माहिती असेल की, सरकारी कर्मचाऱ्यांना सणासुदीच्या दिवसांमध्ये आगाऊ स्वरूपात अनुदान मिळते,त्यालाच “सण अग्रीम” (Festival Advance) असे म्हणतात.
महाराष्ट्रात सर्वसाधारणपणे 12 हजार 500 रुपयांपर्यंत सण अग्रिम देण्यात येते,जे पुढील 10 महिन्यात पगारातून दरमहा समान हप्त्यात वसूल करण्यात येते.
आता कर्मचाऱ्यांच्या सण अग्रिम यामध्ये तब्बल 8 हजार रुपयाची वाढ करण्यात आलेली होती. तर मित्रांनो कोणत्या कर्मचाऱ्याला आणि कोणत्या सणाला घेता येतो याविषयी सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.
Employee Festival Advance
महाराष्ट्र सरकारने अराजपत्रित राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सण अग्रिम रक्कम म्हणून 12 हजार 500 रुपये मिळतात.ज्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार श्रेणी ४८०० पेक्षा जास्त नाही, त्यांना 1 जानेवारी 2006 पासून सुधारित वेतन रचनेनुसार सणांच्या दिवशी सण कर्ज रक्कम देय असते.
सदरील आदेश 23 ऑक्टोबर 2018 पासून म्हणजेच सरकारच्या निर्णयाच्या घोषणेच्या तारखेपासून लागू झाला आहे.सण कर्ज खालील सणांना तसेच सामान्य प्रशासन विभागाकडून वेळोवेळी घोषित करण्यात येणाऱ्या सणांसाठीच अनुज्ञेय असते.
- दिवाळी
- रमझान ईद
- ख्रिसमस
- पारसी नववर्ष
- संवत्सरी
- रोश-होशना
- वैशाखी पौर्णिमा (भगवान बुध्द जयंती)
- स्वातंत्र्य दिन
- प्रजासत्ताक दिन
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती
मित्रांनो, असे असले तरी मागील काही दिवसांपासून शिक्षक व शिक्षक कर्मचारी यांना सन अग्रीम मिळालेले नाही. सरकारने आर्थिक अडचणींच्या कारणाने सदरील संवर्गातील कर्मचाऱ्यांना सण कर्ज मंजूर केलेले नाही. इतर संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अद्यावत माहिती आपल्याकडे नाही.
शासन फक्त शासन निर्णय काढत असतो परन्तु कुठल्याच अधिकाऱ्यांना शासनाने ठरवून दिलेल्या सणाच्या आधी अगरीं मिळत नाही व वेळेवर शासनाने ठरविलेल्या प्रमाणे पतयेक महिन्याच्या 1 तारखेला वेतन बँक खातेमध्ये जमा होत नाही हे आता पर्यंत 28 वर्ष नोकरीचे अनुभहव आहेत तसेच प्रवास भत्ता सुद्धा नियमित मिळत नसल्यामुळे अधिकाऱ्यांना अनर्थ प्रवासात वेतनातून प्रति महिना 5000/-ते 10000/-खरच करावे लागते हे अनुभव आहेत प्रवास भत्या करीत 10 10 वर्ष ग्रांट देत नाही फक्त हवेत शासन निर्णय काढले जातात आश्वाना करिता