Festival Advance : नमस्कार मित्रांनो, आपल्याला माहिती असेल की सरकारी कर्मचाऱ्यांना सणासुदीच्या दिवसांमध्ये आगाऊ स्वरूपात रक्कम मिळत असते.त्यालाच सण अग्रीम असे म्हणतात.महाराष्ट्रात सर्वसाधारणपणे 12 हजार रुपयांपर्यंत सण अग्रिम देण्यात येते,जे पुढील 10 महिन्यात पगारातून दरमहा समान हप्त्यात वसूल करण्यात येते.
आता खालील संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या सण अग्रिम यामध्ये तब्बल आठ हजार रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे. तर काय आहे शासन निर्णय पाहूया सविस्तर
Employee Festival Advance
राज्यातील कोतवालांना संदर्भाधिन शासन निर्णयाच्या अनुषंगाने सण अग्रिम रुपये २०००/- एवढे देण्यात येत आहे. कोतवाल यांच्या उक्त सण अग्रिमामध्ये वाढ करण्याच्या मागणीच्या अनुषंगाने सदर अग्रिमाच्या रकमेमध्ये वाढ करण्यात आली आहे.
शासन आता असे आदेश देत आहे की, राज्यातील कोतवालांना महत्वाच्या सणानिमित्त देण्यांत येणाऱ्या सण अग्रिमाच्या रकमेत वाढ करुन रुपये २०००/- (अक्षरी दोन हजार फक्त) या ऐवजी रुपये १०,०००/- (अक्षरी दहा हजार फक्त) इतके सण अग्रिम प्रत्येक कोतवालास देण्यात यावे. सदर सण अग्रिमाची रक्कम दहा समान हप्त्यात त्यांना देय मानधनातून वळती करुन घेण्यात यावी.
सरकारी कर्मचारी सण अग्रिम
सण अग्रिम फक्त पुढील सणांना तसेच सामान्य प्रशासन विभागाकडून वेळोवेळी घोषित करण्यात येणाऱ्या सणांसाठीच अनुज्ञेय राहील.
(१) दिवाळी
(२) रमझान ईद
(३) ख्रिसमस
(४) पारसी नववर्ष
(५) संवत्सरी
(६) रोश – होशना
(७) वैशाखी पोर्णिमा (भगवान बुध्द जयंती)
(८) स्वातंत्र्य दिन
(९) प्रजासत्ताक दिन
(१०) डॉ. आंबेडकर जयंती
तथापि पूर्वी घेतलेले सण अग्रिम वसूल केल्यानंतरच पुढील सण अग्रिम मंजूर करता येणार आहे.सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या सहमतीने त्या विभागाच्या अनौपचारीक संदर्भ क्र.३९९/२०२४/व्यय-९, दिनांक २५.०९.२०२४ अन्वये दिलेल्या मान्यतेच्या अनुषंगाने निर्गमित करण्यात आला आहे.सदरील आदेश निर्गमित केल्याच्या दिनांकापासून अंमलात येतील.