FD Interest Rates : पंजाब नॅशनल बँकेने (PNB) नवीन वर्षात ग्राहकांना भेट दिली आहे.नवीन वर्षाच्या सुरुवातीला बँकेने FD वरील व्याजदर वाढवले आहेत. बँकेने एफडीवरील व्याज दरात 0.45 % वाढ केली आहे. मात्र, काही एफडीवरील व्याजही कमी करण्यात आले आहे.नवीन दर 1 जानेवारी 2024 पासून लागू झाले आहेत.
PNB Hikes FD Interest Rates
पंजाब नॅशनल बँकेने 180 ते 270 दिवसांच्या एफडीवरील व्याजदर 50 बेसिस पॉइंटने वाढवला आहे. यामुळे आता सर्वसामान्य नागरिकांना या कालावधीसाठी 6% व्याज मिळणार आहे.यापूर्वी या कालावधीसाठी व्याजदर 5.50% होता.
PNB बँकेने 271 दिवसांपासून 1 वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी FD Rates 0.45 टक्क्यांनी वाढवले आहेत.आता सर्वसामान्य नागरिकांना या कालावधीसाठी 7.25% व्याज मिळेल. यापूर्वी या कालावधीसाठी व्याजदर 6.80% होता. पीएनबी बँक सामान्य नागरिकांना 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या एफडीवर 3.50 % ते 7.25 % व्याज देते आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या रेपो दरात वाढ
RBI ने रेपो दरात 100 बेसिस पॉइंटने वाढ केल्यानंतर आता बँकांनी एफडी व्याजदर वाढवण्यास सुरुवात केली आहे. पंजाब नॅशनल बँकेव्यतिरिक्त, इतर बँकांनीही बँक एफडी वरील व्याजदर वाढवले आहे.
Punjab National Bank hikes fd rate
- 7 दिवस ते 14 दिवस: सामान्य लोकांसाठी – 3.50%; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 4 %
- 15 दिवस ते 29 दिवस: सामान्य लोकांसाठी – 3.50 %; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 4 %
- 30 दिवस ते 45 दिवस: सामान्य लोकांसाठी – 3.50 %; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 4 %
- 46 दिवस ते 90 दिवस: सामान्य लोकांसाठी – 4.50 % ; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 5 %
- 91 दिवस ते 179 दिवस: सामान्य लोकांसाठी – 4.50 %; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 5 %
- 180 दिवस ते 270 दिवस: सामान्य लोकांसाठी – 5.50 %; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 6 %
- 271 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी: सामान्य लोकांसाठी – 5.80 %; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 6.30 %
- 1 वर्ष: सामान्य लोकांसाठी – 6.75 %; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.25 %
- 1 वर्ष ते 443 दिवसांपेक्षा जास्त: सामान्य लोकांसाठी – 6.80 %; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.30 %
- 444 दिवस: सामान्य लोकांसाठी – 6.80 %; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.30 %
- 445 ते 2 वर्षे: सामान्य लोकांसाठी – 6.80 %; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.30 %
- 2 वर्ष ते 3 वर्षांपेक्षा जास्त: सामान्य लोकांसाठी – 7%; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.50 %
- 3 वर्ष ते 5 वर्षांपेक्षा जास्त: सामान्य लोकांसाठी – 6.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.00 टक्के
- 5 वर्षे ते 10 वर्षे: सामान्य लोकांसाठी – 6.50 %; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.30 %