Extra Increment : आता या सरकारी कर्मचाऱ्यांना काल्पनिक वेतनवाढ देणार! सेवानिवृत्तीवेतन निश्चित करण्याबाबत महत्वपूर्ण शासकीय निर्णय निर्गमित …

Extra Increment : महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभाग, शासन परिपत्रक दिनांक २७ सप्टेंबर, २०२४ निर्गमित करण्यात आलेले आहे. आता सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वाढीव काल्पनिक वेतन वाढ देऊन सेवानिवृत्ती वेतन निश्चित करण्यात येणार आहे. तर काय आहे शासन निर्णय पाहूया सविस्तर.

Extra Increment for State Employees

शासन परिपत्रक नुसार दि.३० जून रोजी सेवानिवृत्ती झालेल्या किंवा होणाऱ्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना लगतच्या १ जुलै रोजीची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेतली जाणार आहे. आता अशा कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीवेतन निश्चित करण्याबाबत मार्गदर्शक सुचना वित्त विभागाने निर्गमित केल्या आहेत. 

सदर सुचना इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत चालविण्यात येणाऱ्या खाजगी अनुदानित विजाभज प्रवर्गाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक निवासी आश्रमशाळा, विद्यानिकेतन तसेच ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी असलेल्या निवासी आश्रमशाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागु करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

काल्पनिक वेतनवाढ मिळणार !

शासन परिपत्रकान्वये निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सुचना इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत चालविण्यात येणाऱ्या खाजगी अनुदानित विजाभज प्रवर्गाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक निवासी आश्रमशाळा,विद्यानिकेतन तसेच ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी असलेल्या निवासी आश्रमशाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागु करण्यास शासन मान्यता देण्यात येत.

दि.३० जून रोजी सेवानिवृत्ती झालेल्या किंवा होणाऱ्या इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत चालविण्यात येणाऱ्या खाजगी अनुदानित शाळेतील कर्मचारी यांना लाभ मिळणार आहे.

याशिवाय विजाभज प्रवर्गाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक निवासी आश्रमशाळा, विद्यानिकेतन तसेच ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी असलेल्या निवासी आश्रमशाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लगतच्या १ जुलै रोजीची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेतली जाणार आहे.

सेवानिवृत्तीवेतन निश्चित करण्याबाबत विभागाच्या संबंधित क्षेत्रिय कार्यालयांनी संदर्भाधीन परिपत्रकातील सुचनांचे काटेकोरपणे पालन संबंधित विभाग प्रमुखांना करावे लागणार आहे.

Leave a Comment

error: Don't Copy!!