Employees Salary : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली असून रमजान व डॉ.आंबेडकर जयंती च्या मुहूर्तावर मार्च महिन्याचा पगाराचा संदर्भात नवीन अपडेट्स आले आहे. आता या महिन्याचा पगार लवकर होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे.
मार्च महिन्याचे वेतन होणार लवकर !
श्रीमती रजनी रावडे प्रशासन अधिकारो (आस्थापना) शिक्षण आयुक्तालय, पुणे यांनी मा. शिक्षण संचालक, प्राथमिक शिक्षण संचालनालय,महाराष्ट्र राज्य, पुणे, आणि मा. शिक्षण संचालक,माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, दिनांक 27 MAR 2024 रोजी रमजान ईद व डॉ. आंबेडकर जयंती निमित्त्य मार्च २०२४ चे नियमित पगार दि.५ एप्रिल २०२४ पर्यंत करणेबाबत परिपत्रकाद्ववारे कळवले आहे.
मा.श्री.श्रीकांत गोविंदराव देशपांडे, माजी विधान परिषद सदस्य यांचे दि.२०.०३.२०२४ चे निवेदन प्राप्त झाले होते तेव्हा उपरोक्त विषयी संदर्भाधीन निवेदन कृपया अवलोकन व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
Employee salary updates
सदर विषयांकीत प्रकरणी निवेदनामध्ये नमूद केल्यानुसार रमजान ईद व डॉ. आंबेडकर जयंती निमित्य नियमित पगार दि.५ एप्रिल २०२४ पर्यंत करण्याबाबत क्षेत्रिय स्तरावर निर्देश आले आहेत.
तसेच ज्या जिल्हयाचे पगार वेळवर होणार नाहीत,तेथील अधिक्षक, वेतन पथक यांचेवर कार्यवाही करण्याचे आदेश सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक यांना होणे बाबतच्या मागणीच्या अनुषंगाने यथानियम कार्यवाही करावी.
संबंधितांना कळविण्यात यावे ही विनंती करण्यात आली आहे. परिणामी सरकारी कर्मचाऱ्यांचा मार्च महिन्याचा पगार एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.