Employee’s Leave : शासकीय अधिकारी/कर्मचारी यांना राज्य शासनाने राजपत्रातील अधिसुचनेद्वारा जाहीर केलेल्या सण व इतर सुट्ट्या वगळून प्रतीवर्ष महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१ अन्वये खाते प्रमुखाकडे अर्ज देऊन, तो मान्य झाल्यावर रजा उपभोगता येते.
Government Employee’s Leaves
सुट्टी :- महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१, प्रकरण २, नियम ९ (२३) अन्वये, (१) परक्राम्य संलेख अधिनियम १८८१, कलम २५ अन्वये विहीत केलेली अथवा अधिसूचित केलेला शासकीय कार्यालय कामापुरते बंद ठेवण्याचा आदेश याला सुट्टी असे संबोधण्यात येते.
रजा :- महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१, प्रकरण २, नियम ९ (२८) अन्वये, सक्षम प्राधिकाऱ्याने कामावर अनुपस्थित राहण्यास दिलेली परवानगी म्हणजे रजा होय.
रजेचा हक्क :- महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१, प्रकरण ३, नियम १० अन्वये, (१) सक्षम प्राधिकाऱ्याने कामावर अनुपस्थित राहण्यास दिलेली परवानगी म्हणजे रजा.
(२) हक्क म्हणून रजा मागता येत नाही.
(३) रजा मंजूर करण्यास सक्षम अधिकारी, लोकसेवेच्या निकडीमुळे, कोणत्याही प्रकारची रजा नाकारू शकतो किंवा रदद करू शकतो. शासकीय कर्मचाऱ्यास लेखी विनंती खेरीज, देय असलेल्या आणि मागितलेल्या रजेचा प्रकार बदलता येणार नाही.
अखंडीत रजेची कमाल मर्यादा : महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१, प्रकरण ३, नियम १६ अन्वये, शासकीय अधिकारी/कर्मचारी यांना सतत पाच वर्षाहून अधिक कालावधी करीता कोणतीही रजा मंजूर केली जाणार नाही.
Types of Employee’s Leaves
अर्जित रजा (पूर्ण पगारी) (Earned Leave)
प्रत्येक कैलेंडर वर्षाच्या जानेवारी आणि जुलै महिन्याच्या पहिल्या दिवशी प्रत्येकी १० दिवस या प्रमाणे वर्षात दोन हप्त्यात अर्जित रजा आगाऊ जमा होते.एका वेळी सलग १८० दिवस अर्जित रजा घेता येते.(३०० दिवसापर्यंत रजा खात्यात जमा करुन ठेवता येते)
अर्ध वेतनी रजा (Half pay Leave)
देय असलेल्या अर्थ वेतनी रजेच्या निम्मे दिवस सदरील रजा मिळते. सेवेच्या पूर्ण केलेल्या प्रत्येक वर्षासाठी २० दिवस मिळते. प्रत्येक कॅलेंडर वर्षाच्या जानेवारी आणि जुलै महिन्याच्या पहिल्या दिवशी, प्रत्येकी १० दिवस या प्रमाणे वर्षात दोन हप्त्यात आगाऊ जमा होते. यात निलंबन काळ धरू नये.
परिवर्तीत रजा (Commuted Leave)
अर्धपगारी रजा दुप्पट खर्ची टाकुन परिवर्तीत रजा मिळते. कमाल ९० दिवस. (एकूण उपभोगलेली रजा ही अर्ध वेतनी रजेच्या दुप्पट दिवस खर्ची पडेल)
अनिर्जित रजा (Leave not due)
वैद्यकीय प्रमाणपत्र असल्यास, जेवढी अर्थ वेतनी रजा अर्जित होण्याची शक्यता असेल तितके दिवस घेता येते.एकूण सेवेत कमाल ३६० दिवस. एका वेळेस ९० दिवस, संपूर्ण सेवा काळात कमाल १८० दिवस उपभोगता येते.
असाधारण रजा (Extraordinary Leave)
तीन वर्ष सतत सेवा पूर्ण झाल्यावर ६ महिने तर पाच वर्ष सतत सेवा पूर्ण – १२ महिने ही राजाजिल्हा शल्य चिकित्सक यांच्या प्रमाणपत्रावर मानसिक आजार, कर्करोग ई. साठी १८ महिने. कर्मचाऱ्याच्या रजा खात्यावर कोणतीही रजा अनुज्ञेय नसेल तर किंवा विनंती वरुन ही रजा घेता येते. यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक असते.
परिविक्षाधीन कर्मचाऱ्यास रजा (Leave on Probation)
अनुज्ञेय रजा मिळण्याचा हक्क असेल. त्यापेक्षा जास्त रजा घेतल्यास परिविक्षाधिन काळात वाढ केली जाईल.
निवृत्तीपूर्व रजा (Leave to Preparatory to Retirement)
नियत सेवा निवृत्तीच्या तारखेपलिकडे जाणार नाही ही दक्षता घेऊन कमाल १८० दिवस कमाल २४ महिने रजा घेता येते.
प्रसूती रजा (Maternity Leave)
१८० दिवस पगारी रजा घेता येते.शासकीय सेवेत असणाऱ्या महिला कर्मचाऱ्यास, (नव्याने रुजु झालेल्यांसह) दोनपेक्षा कमी मुले हयात असतील तर अर्जाच्या तारखेपासून १८० दिवस घेता येते.किमान सेवेची अट रद्द करण्यात आली आहे.
विशेष नैमिनिक रजा (Special Casual Leave)
- स्वतः नसबंदी शस्त्रक्रिया केल्यास ६ दिवस विशेष नैमिनिक रजा मिळू शकते. (वैद्यकीय दाखला आवश्यक)
- एकदा केलेली नसबंदी शस्त्रक्रिया अयशस्वी झाल्यामुळे दुसऱ्यांदा नराबंदी शस्त्रक्रिया केल्यास ६ दिवस विशेष नैमिनिक रजा मिळू शकते. (वैद्यकीय दाखला आवश्यक)
- कर्मचाऱ्याच्या पत्नीने बाळंतपणानंतर लगेचच संतती नियमनाची शस्त्रक्रिया केल्यास कर्मचाऱ्यास ४ दिवस विशेष नैमित्तिक रजा मिळू शकते. (वैद्यकीय दाखला आवश्यक)
- कर्मचाऱ्याच्या पत्नीच्या बाळंतपणाव्यतिरिक्त अन्य वेळी संतती नियमनाची शस्त्रक्रिया केल्याम कर्मचाऱ्यास ७ दिवस विशेष नैमित्तिक रजा मिळू शकते. (वैद्यकीय दाखला आवश्यक)
- स्त्री कर्मचाऱ्याने बाळंतपणाव्यतिरिक्त अन्य वेळी संतती नियमनाची शस्त्रक्रिया केल्यास स्री कर्मचाऱ्यास १४ दिवस विशेष नैमित्तिक रजा मिळू शकते. (वैद्यकीय दाखला आवश्यक)
विशेष रजा (Special Leave)
स्त्री कर्मचाऱ्याने अनाथ मुल दत्तक घेतल्यास विशेष रजा अनुज्ञेय आहे.दनक मुलाचे वय एक वर्ष असल्यास १८० दिवस रजा आणि दत्तक मुलाचे वय एक वर्षपिक्षा जास्त परंतु तीन वर्षापर्यंत असल्यास ९० दिवस रजा मिळते.
विशेष नैमित्तिक रजा (Special Casual Leave)
- कर्मचाऱ्याने स्वेच्छेने विनामूल्य रक्तदान केल्यास कर्मचाऱ्यास ? दिवस विशेष नैमित्तिक रजा मिळू शकते. (एका वर्षात कमाल १० दिवस) (वैद्यकीय दाखला आवश्यक)
- राष्ट्रीय क्रिडा स्पर्धेत भाग घेण्यागाठी कॅलेंडर वर्षात ३० दिवस विशेष नैमिनिक रजा मिळू शकते. (क्रिडा अधिकाऱ्याचा दाखला आवश्यक)
- कर्मचाऱ्याच्या पत्नीने बाळंतपणानंतर किंवा अन्य वेळी केलेली नसबंदी शस्त्रक्रिया अयशस्वी झाल्यामुळे दुसऱ्यांदा नसबंदी शस्त्रक्रिया केल्याम कर्मचाऱ्यास ७ दिवस विशेष नैमित्तिक रजा मिळू शकते. (वैद्यकीय दाखला आवश्यक)
नैमिनिक/किरकोळ रजा Casual Leave)
- १ जानेवारी ते ३१ डिसेंबर किरकोळ कॅलेंडर वर्षात १२ दिवस घेता येते.अचानक,आपत्कालीन खाजगी कामासाठी ग्जा) किरकोळ रजा अत्यंत निकड असतांना काढली जाते.
- साधारणपणे एका वेळी तीन दिवसांहून जास्त घेता येत नाही. अपवादात्मक परिस्थितीतच दहा दिवसा बाढविता येते. (किरकोळ रजा शक्यतोवर बिनपगारी करू नये. किरकोळ रजा नामंजूर करता येत नाही.नाकारण अथवा रद्द करणे अशी तरतूद कायदयात नाही. प्रसंगी अर्ज नसला तरीही किरकोळ रजा नाकारू नये.
- अर्जित वा अन्य प्रकारांच्या रजेला जोडन किरकोळ रजा घेता येत नाही, अथवा किरकोळ रजेला जोडन अर्जित बा अन्य प्रकारांच्या रजा घेता येत नाहीत.सार्वजनिक सुट्टी जोडून घेता येते. (कमाल सात ते दहा दिवस) सेवापुस्तकात नोंद घेता येत नसून स्वतंत्र नोंदवही ठेवावी लागते.
अध्ययन रजा
- कर्मचाऱ्याच्या कर्तव्यक्षेत्राशी संबंध असलेल्या विषयातील उच्च शिक्षण / पाठयक्रम, भारतामध्ये किंवा भारताबाहेर पूर्ण करण्यासाठी. कमीत कमी पाच वर्षाची सेवा होणे आवश्यक असते.रजा संपल्यानंतर कामावर परत येणे आवश्यक कमीत कमी ३ वर्षे सेवा करणे गरजेचे आहे. सदरील रजा हक्क म्हणून मागता येत नाही.एकाच व्यक्तीला वारंवार मंजूर करता येत नाही.
- भारताबाहेरील अभ्यासक्रमासाठी अभ्यासक्रम भारतात उपलब्ध नसल्याचे सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र आवश्यक असते.
- अभ्यासक्रम/प्रशिक्षण लोकहिताच्यादृष्टिने निश्चित लाभदायक असल्याचे सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र आवश्यक असते. सदरील रजा कालावधी १२ ते २४ महिने असू शकतो.
Very nice information for all employees.m
शिक्षाकांना निवृत्ती च्या वेळी रजा रोखीने मिळणारी ( म्हणजे ३०० दिवस रजा विकुन ) रक्कम मिळते का.
नाही