Employee Transfer : महत्वाचे अपडेट ! “या” राज्य कर्मचाऱ्यांच्या बदली संदर्भात नवीन धोरण निश्चित; शासन निर्णय आला ….

Employee Transfer : दिनांक १८-४-२०१३ च्या शासननिर्णयान्वये जिल्हा परिषदेच्या गट क व गट ड मधील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे धोरण निश्चित करण्यात आले होते.

सदर धोरणाची अंमलबजावणी करताना आलेले अनुभव तसेच सदर धोरणांमध्ये सुधारणा करण्यासंदर्भात, शासनाकडे विविध जिल्हा परिषद कर्मचारी व त्यांच्या संघटना यांचेकडून प्राप्त निवेदनांच्या अनुषंगाने आवश्यक त्या बार्बीचा विचार करून कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्यांबाबतचे धोरण १५ मे २०१४ शासन निर्णयाद्वारे सुधारित करण्यात आले होते.

जिल्हा परिषदेच्या गट-क (वर्ग-३) व गट-ड (वर्ग-४) च्या कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्यांचे धोरण,कार्यपध्दती व निकष निश्चित करण्यात आले आहे.

जिल्हा परिषद कर्मचारी बदली अपडेट्स

गट- क (वर्ग-३) व गट-ड (वर्ग-४) च्या कर्मचाऱ्यांच्या बदल्यांपूर्वी तसेच समुपदेशन प्रसंगी सादर करावयाचा नमुना परिशिष्ट- १ प्रमाणे असेल. त्याप्रमाणे बदलीपात्र/इच्छुकांनी अर्ज सादर करावे. सदर बदल्यांबाबतची कार्यवाही पूर्ण झाल्यावर सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी / गट विकास अधिकारी यांनी सोबत जोडलेल्या परिशिष्ट-२ मध्ये दर्शविलेल्या विहित विवरणपत्रामध्ये माहिती भरुन ती दरवर्षी दिनांक ३० जूनपर्यन्त शासनाकडे पाठवावी.

बदलीसंबंधाने कोणत्याही प्रकारची अनियमितता होऊ नये याबाबत विभागीय आयुक्त यांनी दक्षता घ्यावी. विहित पध्दतीनुसार प्रशासकीय बदल्या करणे आवश्यक आहे.अन्यथा कसूर करणारा अधिकारी शिस्तभंगाच्या कारवाईस पात्र राहील.

हे पण वाचा ~  Group Insurance : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 15 लाख विमा संरक्षण! समूह वैयक्तिक अपघात विमा योजना काय आहे ? पहा सविस्तर ...

ZP Employees transfer

बदल्यांबाबतच्या अनियमिततेबाबतची तक्रार प्राप्त झाल्यास त्याअनुषंगाने अनियमितता दूर करण्याच्या व अनियमिततेस जबाबदार असणाऱ्याविरुध्द नियमानुसार आवश्यक ती कार्यवाही विभागीय आयुक्त यांनी करावी.

गट- क (वर्ग-३) व गट-ड (वर्ग-४) च्या बदल्यांसंदर्भात शासन वेळोवेळी आदेश देईल ते आदेश सर्व जिल्हा परिषदांना / पंचायत समिती यांना बंधनकारक राहतील.

सदर शासन निर्णयातील प्रकरण-१ मधील कलम ३ (क) येथे “विधवा, परित्यक्ता/घटस्फोटित महिला कर्मचारी यानंतर व कर्करोगाने (कॅन्सर) आजारी/पक्षघाताने आजारी/डायलेसिस सुरु असेलेले कर्मचारी या अगोदर “४० वर्षावरील वयाच्या अविवाहित महिला कर्मचारी” असा मजकुर समाविष्ट करण्यात येत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don't Copy!!