Fixed deposit : नमस्कार मित्रांनो, आपल्याला माहिती असेल की लोक आता सुरक्षित गुंतवणूक कडे पळताना दिसत आहेत शेअर बाजारात होत असलेल्या चढउतारामुळे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांबरोबरच सामान्य माणसं सुद्धा आता बँकेतील एफ डी मध्ये पैसे गुंतवण्याच्या पर्यायाला पसंती देत आहेत.
भविष्यात कोणती आर्थिक अडचण आणि धोका न पत्करता डिपॉझिट हा अत्यंत सोपा आणि खात्रीशीर मार्ग आहे, परंतु एफडी केल्यानंतर ती मुदतपूर्व मोडल्यास असंख तोटे ग्राहकांना सहन करावे लागतात त्याविषयी सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत..
Fixed deposit investment rules
आपली बचत सुरक्षित ठेवण्यासाठी एक लोकप्रिय मार्ग म्हणजे एफडी गुंतवणूक, (FD investment tips) जिथे गुंतवणूकदारांना कमी जोखमीसह निश्चित लाभ मिळू शकतो. बचत ठेव योजनेत ठरावीक कालावधीसाठी वेगवेगळ्या योजना असतात, ज्या 1 वर्ष ते 10 वर्ष (FD tenure period) पर्यंतच्या असू शकतात. मित्रांनो सदरील योजनेत वेगवेगळ्या प्रकारांसाठी वेगवेगळ्या व्याजाची संरचना केलेली असते. आपण आपल्या गरजेनुसार योजना निवडू शकतो.
मित्रांनो, अनेक वेळा आर्थिक अडचणींमुळे एफडीला मुदतपूर्वी तोडावे लागते, ज्यामुळे एफडी (FD best investment plan) धारकाला नुकसान होऊ शकते. Fixed deposit मुदतपूर्वी तोडण्यासाठी काही नियम आहेत, जे लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
एफडी घेतल्यानंतर जर तुम्ही एफडी मुदतपूर्वी तोडली, तर तुम्हाला मिळणाऱ्या व्याजाच्या लाभाचा तोटा होतो.FD maturity period होण्यापूर्वी ती तोडल्यास तुम्हाला अपेक्षित लाभ न मिळता तुमचे नुकसानही होऊ शकते.
FD Pre maturity penalty
आपण जर बँकेत Fixed Deposit (FD) केलेले असेल आणि मुदतीपूर्वी आपण ही एफ डी मोडली तर आपल्याला संपूर्ण लाभ मिळत नाही बँक काही विशिष्ट नियमानुसार मुदतपूर्व एफडी मोडल्यास शुल्क आकारतात.
उदाहरणार्थ, जर तुम्ही 5 लाख रुपयांपर्यंतची रक्कम जमा केली असेल, तर तुम्हाला 0.50 % शुल्क (FD Pre-mature penalty) भरावे लागेल. जर रक्कम 5 लाखांपेक्षा जास्त आणि 1 कोटींपेक्षा कमी असेल, तर हे शुल्क 1 % होईल. याबरोबरच मित्रांनो आपल्या एफडीच्या मिळणाऱ्या व्याजावर सुद्धा आपल्याला तोटा सहन करावा लागू शकतो.थोडक्यात मुदतपूर्वी एफडी तोडल्यास अपेक्षित फायद्याऐवजी तुम्हाला कमी परतावा मिळू शकतो.
FD deposit Tips
1) मुदतपूर्वी एफडी तोडल्यामुळे होणाऱ्या तोट्यापासून वाचण्यासाठी मोठ्या कालावधीच्या डिपॉझिटऐवजी लहान कालावधीच्या डिपॉझिटमध्ये पैसे गुंतवावे.
2) आपल्या जवळ जर 5 लाख रुपयांची रक्कम असेल, आणि आपल्याला त्याची एफडी करायची असेल तर आपण 1-1 लाख रुपयांच्या वेगवेगळ्या भागांमध्ये विभागून स्वतंत्र FD करावी.
3) जर FD दीर्घ मुदतीसाठी (FD tenures) असेल आणि पैशांची गरज भासली, तर ती तोडण्याऐवजी त्यावर Loan घेऊन आर्थिक गरज भागवू शकता.