Close Visit Mhshetkari

Employee medical insurance : खुशखबर … आता ‘ या’ कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी मुंबई / कोकण विभागासाठी तीन नवीन रुग्णालयांचा समावेश 

Employee medical insurance : महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय दिनांक २४ सप्टेंबर, २०२४ नुसार पोलीस अधिकारी / कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी मुंबई / कोकण विभागासाठी तीन नवीन रुग्णालयांचा समावेश करणेबाबत नवीन शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे.तर काय आहे बातमी पाहूया सविस्तर.

Employee medical insurance Hospital

गृह विभागातील वय वर्षे ४० ते ५० या वयोगटातील अधिकारी व कर्मचारी यांना दोन वर्षातून एकदा व वय वर्षे ५१ व त्यावरील वयोगटातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांना दरवर्षी वैद्यकीय तपासणी करण्यात येते.

सदरील वैद्यकीय तपासणीकरीता रु.५०००/- या प्रमाणे इतक्या रकमेपर्यंत खर्चाची प्रतिपुर्ती गृह विभागातील प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यांना अदा करण्याबाबत “अपवादात्मक बाब” म्हणून सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयाच्या प्रपत्र-अ येथे नमूद करण्यात आली आहे.

अपवादात्मक परिस्थितीत आलेल्या खाजगी रुग्णालयाव्दारे उपलब्ध करुन देण्यास सार्वजनिक आरोग्य विभागाच्या शासन शुध्दीपत्रकाव्दारे मान्यता देण्यात आलेली आहे. आता या पार्श्वभूमीवर गृह विभागातील पोलीस अधिकारी / कर्मचारी यांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी मुंबई / कोकण विभागासाठी रुग्णालयांच्या यादीमध्ये नव्याने तीन रुग्णालयांचा समावेश करण्यात आला आहे.

हे पण वाचा ~  Extra Increment : आता या सरकारी कर्मचाऱ्यांना काल्पनिक वेतनवाढ देणार! सेवानिवृत्तीवेतन निश्चित करण्याबाबत महत्वपूर्ण शासकीय निर्णय निर्गमित ...

वैद्यकीय तपासणी खाजगी रुग्णालय

गृह विभागातील पोलीस अधिकारी / कर्मचारी यांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी मुंबई / कोकण विभागासाठी सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयाच्या प्रपत्र-अ मध्ये नमूद केलेल्या रुग्णालयांव्यतिरिक्त नव्याने समाविष्ट करण्यात आलेली रुग्णालय खालील प्रमाणे आहेत.

१) अपोलो क्लिनिक, वाशी 

२) अपोलो क्लिनिक, अंधेरी (पूर्व) 

३) अपोलो क्लिनिक,नाशिक या तीन रुग्णालयांतून 

आता सदरील खाजगी रुग्णालयांना वैद्यकीय तपासणी करण्यास या शासन निर्णयाव्दारे मान्यता देण्यात आली आहे.सदर शासन निर्णयाच्या अनुषंगाने आवश्यकता असल्यास विहित कार्यपध्दती निश्चित करण्याची कार्यवाही गृह विभागामार्फत करण्यात येईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don't Copy!!