Employee Credit Card : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना राबविल्या जातात. त्यांना त्यांच्या कामाचा उचित मोबदला दिला जातो.याशिवाय त्यांना वेगवेगळे भत्ते देखील पुरवले जातात.
आता शासकीय सेवेत असलेल्या सरकारी कर्मचारी वर्गासाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर आली आहे. राज्य व केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी बाजारात एक नवीन Credit Card आले आहे.याविषयी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
सन्मान रुपे क्रेडिट कार्ड
सरकारी कर्मचऱ्यांसाठी बाजारात एक नवीन क्रेडिट कार्ड लॉन्च झाले असून यामधून अनेक फायदे मिळणार आहेत. बँक ऑफ बडोदा (BoB) व इंडसइंड बँकेने हे क्रेडिट कार्ड सुरू केले आहे. बँकेने याला ‘सन्मान रुपे क्रेडिट कार्ड’ असे नाव दिले आहे.
क्रेडिट कार्ड हे upi enable आहे.दोन्ही बँकेने नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया सोबत भागीदारी केलेली आहे.क्रेडिट कार्डचा IRCTC च्या व्यवहारात आणि पेट्रोल डिझेलच्या खरेदीमध्ये वापर केला तर सरचार्जवर सूट दिली जाणार आहे.
सन्मान रुपे क्रेडिट कार्डचे फायदे
इंडसइंड बँक,बँक ऑफ बडोदा (BoB) द्वारा जारी केलेले एक वैयक्तिक क्रेडिट कार्ड आहे.कार्ड विनामूल्य असून अनेक फायदे आहेत.
वार्षिक शुल्क :- सन्मान रुपे क्रेडिट कार्डचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे त्याचे 0% वार्षिक शुल्क होय.
बँक चार्ज : – सन्मान रुपे क्रेडिट कार्डवर कोणतेही बँक चार्ज नाहीत.यामध्ये विलंब शुल्क, व्याजाचे शुल्क आणि प्रीपेड शुल्क 0% आहे.
विलंब शुल्क :- सन्मान रुपे क्रेडिट कार्डवर विलंब शुल्क नाही. हे कार्ड वापरकर्त्यांना त्यांच्या बिलाची थकबाकी भरण्यास विलंब झाल्यास अतिरिक्त खर्च टाळण्यास मदत करते.
विशेष ऑफर आणि सवलती :- सन्मान रुपे क्रेडिट कार्ड धारकांना विविध प्रकारच्या विशेष ऑफर आणि सवलतींचा लाभ मिळू शकतो. यामध्ये रिसॉर्टमध्ये सवलत, रेस्टॉरंट्समध्ये सवलत आणि खरेदीवर सवलत यांचा समावेश आहे.
सन्मान रुपे क्रेडिट कार्डसाठी पात्रता
क्रेडिट कार्डसाठी पात्र होण्यासाठी, तुम्हाला खालील निकष पूर्ण करणे आवश्यक आहे.
- वय 18 वर्षे किंवा त्याहून अधिक असणे आवश्यक
- मासिक वेतन 10 हजार रूपये किंवा त्याहून अधिक आवश्यक
- क्रेडिट स्कोअर चांगला असणे आवश्यक
क्रेडिट कार्डसाठी अर्ज कसा करावा?
या रुपे क्रेडिट कार्डसाठी अर्ज करण्यासाठी,तुम्ही BoB च्या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करू शकता किंवा तुमच्या जवळच्या BoB शाखेत जाऊन अर्ज करू शकता.
आवश्यक कागदपत्रे
अर्ज करण्यासाठी, तुम्हाला खालील कागदपत्रे आवश्यक असतील.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- उत्पन्नाचे पुरावे
सदरील क्रेडिट कार्डमुळे सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.दैनंदिन पैशांच्या गरजा पूर्ण होतील अशी आशा व्यक्त केली जात आहे.
Documents required shown doesn’t need government id so is it for all consumers having mim pay 10k