Earned Leave : शिक्षक आमदार श्री.ज.मो.अभ्यंकर, मुंबई यांच्या समवेत सहविचार सभा दिनांक ९.१२.२०२४ रोजी आयोजित करण्यात आली होती. सदरील मीटिंग मधील निर्णयानुसार श्री.संदीप संगवेविभागीय शिक्षण उपसंचालक, मुंबई विभाग, मुंबई यांनी खालील सूचना परिपत्रकाद्वारे केलेल्या आहेत.
महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) विनियमन अधिनियम, १९७७ मधील ५ (२) नुसार सहायक शिक्षक (परिवीक्षाधीन) म्हणून नेमणूक करण्यात आलेली प्रत्येक व्यक्ती तीन वर्षाच्या कालावधीसाठी परिविक्षाधीन असेल असे नमूद आहे.
अर्जित रजा रोखिकरण नियम
सदरील परिपत्रकानुसार महाराष्ट्र खाजगी शाळा सेवेच्या शर्ती (नियमावली) १९८१ मधील नियम १६ (२३) नुसार “अस्थायी (परिविक्षाधीन) कर्मचाऱ्याला नैमितिक व प्रसूती रजेव्यतिरिक्त अन्य कोणतीही रजा सेवेतून मिळण्याचा हक्क असणार नाही, अस्थायी कर्मचाऱ्याची जेव्हा स्थायी पदावर नियुक्ती करण्यात येईल तेव्हा, त्याची पुर्वीची सलग सेवा स्थायी कर्मचारी म्हणून असती तर ती रजा मिळण्यास तो पात्र झाला असता ती रजा मिळण्याचा त्यास हक्क असेल.” असे सूचित केले आहे.
Earn Leave new update
शालेय शिक्षण विभागाने वेळोवेळी निर्मित केलेले शासन निर्णयानुसार खाजगी शाळेतील कर्मचारी यांच्यासाठी लागू केलेल्या अर्जित रजा, वैद्यकीय रजा, बालसंगोपन रजा व इतर विशेष रजा लागू राहतील. त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी असे स्पष्ट केले आहे.
थोडक्यात कंत्राची पद्धतीने भरती होणारे कर्मचारी जसे की कृषी सेवक,आरोग्य सेवक,शिक्षण सेवक इत्यादीना पर्यवेक्षक कालावधीत असणाऱ्या अजित राजा आता खात्यात जमा होणार आहे.