E peek pahani : आपल्या गावातील शेतकऱ्यांची ई पीक पाहणी यादी पहा मोबाबलवर!

E peek pahani : नमस्कार शेतकरी बंधूंनो आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र सरकारने शेतीतील पिकांचे नोंदणी ऑनलाइन पद्धतीने करण्यासंदर्भात एक नवीन पद्धती विकसित केलेली आहे. ज्याद्वारे आपल्या शेताचा पीक पेरा शेतकरी स्वतः भरू शकतात.

ई पीक पाहणीचा फायदा असा होतो की जेव्हा नैसर्गिक आपत्ती किंवा इतर कारणांनी आपल्या शेतातील पिकाचे नुकसान होते.त्यावेळेस पीक विमा त्याचबरोबर सरकारकडून मिळणारी मदत योग्य प्रकारे मिळेल.

E- Peek Pahani List

आता सरकारने यावर्षीच्या पीक पाणी संदर्भात वेळोवेळी मुदतवाढ करून दिलेली आहे. अजून सुध्दा २५ सप्टेंबर २०२३ ही ई पिक पाहणी करण्याची शेवटची तारीख आहे.बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील ई – पाहणी पूर्ण केलेली आहे.

शेतकऱ्यांना ई – पीक पाहणी करताना तांत्रिक अडचणी येत होत्या.अशावेळी आपण केलेली पीक पाहणी योग्यरीत्या पूर्ण झाली किंवा नाही? हे कसे पाहायचे यासंदर्भात आपण या लेखांमध्ये सविस्तर माहिती बघणार आहोत.

अशी पहा ई पीक पाहणी यादी

  • आपल्या मोबाईलमधील ई-पीक पाहणी अँप सर्व प्रथम ओपन करा.
  • आपल्याकडे जर ई-पीक पाहणी अँप गुगल प्लेस्टोअरवरून डाउनलोड करून घ्या.
  • आता आपला विभाग निवडा आहे.
  • यानंतर खातेदार शेतकऱ्यांचे नाव निवडावे.
  • शेवटी ४ अंकी संकेताक नंबर टाकून लॉगीन करावे.
  • ॲप ओपन झाल्यावर तुम्हाला विविध पर्याय दिसतील यापैकी पिक माहिती नोंदवा या पर्यायावर क्लिक करावे
  • या नंतर पिकांची माहिती पहा या पर्यायावर क्लिक करा.
  • याठिकाणी आपण नोंदणी केलेल्या पिकांची संपूर्ण माहिती या पहायला मिळते.
  • अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या गावातील E-peek pahani list ऑनलाईन पाहू शकता.
हे पण वाचा ~  Robot Companies : भारतातील रोपटिक क्षेत्रातील अग्रगण्य कंपन्या; घरगुती वापरापासून औद्योगिक क्षेत्रापर्यंत असणार दबदबा ...

ई पीक पाहणी मोबाईल ॲप येथे डाऊनलोड करा

➡️➡️ E Peek Pahani ⬅️⬅️

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don't Copy!!