Deepseek AI : सध्या जगभरात DeepSeek AI ची चर्चा सुरू आहे. हा एक नवीन आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) चॅटबॉट आहे, जो ChatGPT,Copilot, आणि Gemini सारख्या प्रसिद्ध AI टूल्सला कडक टक्कर देत आहे.
DeepSeek हा चिनी कंपनीने अलिकडेच लॉन्च केला आहे आणि अवघ्या काही दिवसांतच तो जगभरात लोकप्रिय झाला आहे. हा चॅटबॉट वापरकर्त्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे सहजपणे शोधण्यास मदत करतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, हा AI टूल पूर्णपणे मोफत असून कोणीही ते वापरू शकतो.
DeepSeek AI कसे वापरावे?
DeepSeek वापरणे अत्यंत सोपे आहे. तुम्ही ते तुमच्या स्मार्टफोन किंवा लॅपटॉपवर सहज वापरू शकता. यासाठी खालील पायऱ्या अनुसरण करावे.
स्मार्टफोनवर DeepSeek वापरणे
- गुगल प्ले स्टोअर (Android) किंवा अॅपल अॅप स्टोअर (iOS) वरून DeepSeek अॅप डाउनलोड करा.
- तुम्ही तुमच्या ब्राउझरमध्ये chat.deepseek.com टाईप करून देखील DeepSeek वर प्रवेश करू शकता.
- अॅप डाउनलोड केल्यानंतर, तुमच्या Google अकाउंटचा वापर करून साइन-इन करा.
- अॅपमध्ये ChatGPT सारखा युजर इंटरफेस (UI) दिसेल. टेक्स्ट बॉक्समध्ये तुमचा प्रश्न टाईप करा आणि उत्तर मिळवा.
- जुन्या चॅट्स पाहण्यासाठी, वरच्या डाव्या कोपऱ्यातील आडव्या रेषांवर टॅप करा.
लॅपटॉपवर DeepSeek वापरणे
- तुमच्या ब्राउझरमध्ये chat.deepseek.com टाईप करा.
- Google अकाउंट वापरून साइन-इन करा.
- टेक्स्ट बॉक्समध्ये तुमचा प्रश्न टाईप करा आणि AI कडून त्वरित उत्तर मिळवा.
DeepSeek चे फायदे
DeepSeek AI तुमच्या प्रश्नांची उत्तरे त्वरित देते.
कोणत्याही खर्चाशिवाय AI चॅटबॉटचा वापर करता येतो.
स्मार्टफोन, टॅब्लेट आणि लॅपटॉपवर सहज वापरता येतो.
ChatGPT प्रमाणे सध्या DeepSeek मध्ये सर्व प्रकारची वैशिष्ट्ये उपलब्ध नाहीत.DeepSeek AI हा एक उत्तम पर्याय आहे जो ChatGPT सारख्या प्रसिद्ध AI टूल्सला प्रतिस्पर्धा देण्यास सक्षम आहे. तो मोफत आहे, वापरण्यास सोपा आहे आणि सर्व डिव्हाइसवर वापरता येतो. जर तुम्हाला AI चॅटबॉटचा वापर करून प्रश्नांची उत्तरे शोधायची असतील, तर DeepSeek हा एक उत्तम पर्याय आहे.