Dearness Allowance Hike : नमस्कार मित्रांनो, केंद्रीय कर्मचारी त्याचबरोबर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे.कर्मचाऱ्यांना आता होळीच्या शुभमुहूर्तावर आणखी एक गिफ्ट मिळणार आहे.
कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ होणार आसून,महागाई भत्ता किती होणार याविषयी सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.
Dearness Allowance Hike updates
मित्रांनो,आपल्याला माहित असेल की कर्मचाऱ्यांना वर्षातून दोन वेळेस महागाई भत्ता मिळत असतो यामध्ये साधारणपणे 1 जानेवारी आणि 1 जुलै या दोन तारखेला महागाई भत्त्यात वाढ केली जाते.केंद्रीय कर्मचाऱ्यांना सध्या 53% दराने महागाई भत्ता मिळत आहे,जो जुलै 2024 पासून वाढलेला आहे.
आता डिसेंबर 2024 च्या महागाई निर्देशांकानुसार 1 जानेवारी 2025 पासून नवीन महागाई भत्ता ठरणार असून याचा आदेश लवकरच निघण्याची शक्यता अर्थतज्ञंकडून व्यक्त करण्यात येत आहे.दरवर्षीचा इतिहास पाहता सरकार होळीच्या आसपास कर्मचाऱ्यांना डीए वाढ देत असते.
महागाई निर्देशांकाचा विचार करायचा झाल्यास मित्रांनो डिसेंबर 2025 मध्ये महागाई निर्देशांक विचार करता महागाई भत्त्यात साधारणपणे तीन ते चार टक्के वाढ होऊ शकते.
महागाई भत्ता कॅल्क्युलेटर
आता 1 जानेवारी 2025 पासून “Dearness Allowance” मध्ये साधारणपणे 3 % वाढ मिळाल्यास आपल्याला खालील प्रमाणे महागाई भत्ता वाढ आणि फरक मिळू शकतो.
- आपले मूळ वेतन जर 40400 रुपये असेल तर
- सध्या मिळणारा महागाई भत्ता (DA 53% ) – 21412/-
- नवीन महागाई भत्ता (56% DA) – 22,624/-
- महागाई भत्ता (DA) च्या वाढीवर दर महिन्याला अधिक मिळणारे वेतन – Rs 1212/-
- थकित 4 महिन्याचा महागाई भत्ता फरक – 4848/-
आपल्याला माहिती असेल मित्रांनो की,नुकतंच महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना डीएवाढीचे गिफ्ट मिळालेला आहे. फेब्रुवारीच्या पगारात 53% महागाई भत्ता वाढीबरोबरच फरक सुद्धा मिळणार आहे.
आता पुन्हा एकदा केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यात वाढ मिळाल्यानंतर राज्य कर्मचाऱ्यांना सुद्धा महागाईपासून दिलासा मिळणार आहे.