Dearness Allowance : नमस्कार मित्रांनो,आपल्याला माहिती असेल की केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाईबत्त्यात नुकतीच वाढ करण्यात आलेली आहे आता सरकारी कर्मचाऱ्यांना 53% वरून 55% दराने महागाई भत्ता मिळत आहे.
मित्रांनो,असे असले तरी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याचा लाभ अजून पर्यंत मिळालेल्या नाही. केंद्र सरकारने अगोदरच DA Hike उशिरा जाहीर केल्यानंतर महाराष्ट्रातील कर्मचारी सुद्धा महागाई भत्ता दरवाढीपासून अद्याप वंचित आहे. तर ही मागे भत्ता वाढ केव्हा मिळणार आणि किती वाढणार याविषयी सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.
Dearness Allowance hike news
केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळाल्यानंतर आता आम्हाला सुद्धा डीएम मध्ये वाढ करावी अशी मागणी राज्य कर्मचाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान या संदर्भात एक नवीन अपडेट समोर आलेली आहे.
दिनांक 28 मार्च 2025 रोजी केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला होता सदरील शासन निर्णया मध्ये जानेवारी फेब्रुवारी मार्च महिन्याचा फरक सुद्धा कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.
अक्षय तृतीयाच्या आधी मिळणार मोठी भेट
महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना सध्या 53 टक्के दराने महागाई भत्ता दिला जात आहे. मात्र लवकरच राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्यात २ टक्क्याची वाढ होणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार राज्य शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53 टक्क्यांवरून 55% करण्याबाबतचा निर्णय एप्रिल अखेरीस होण्याची शक्यता आहे.
सदरील शासन निर्णय एप्रिल अखेर जरी येणार असला तरी जानेवारी ते एप्रिल चार महिन्याचा फरक सुद्धा कर्मचाऱ्यांना रोखते मिळणार आहे.तथापि याबाबतची अधिकृत माहिती अजूनही समोर आलेली नाही.
राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता नेमका कधी वाढणार या संदर्भातील शासन निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर जारी होणार आहे.
आतापर्यंतच्या वाटचालीनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढल्यानंतर साधारणपणे एक ते दोन महिन्यात राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुद्धा वाढत असतो.
अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर कर्मचाऱ्यांना सदर ‘Dearness Allowance’ वाढीचे गिफ्ट मिळू शकते.सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा अनुक्रमे जानेवारी आणि जुलै महिन्यापासून लागू केली जात असते.