Close Visit Mhshetkari

Dearness Allowance : आनंदाची बातमी… सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ ; पहा किती वाढणार पगार व फरक …

Dearness Allowance : नमस्कार मित्रांनो, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे आपण सकाळीच माघारी भत्ता संदर्भात एक महत्वाची अपडेट दिली होती ती आता खरी ठरलेली आहे कर्मचाऱ्यांच्या डीए मध्ये तीन टक्के ची वाढ करण्यात आलेली आहे.

Dearness Allowance Hike

राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता.

शासनाने असे आदेश देत आहे की, दिनांक १ जुलै, २०२४ पासून ७ व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनसंरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर ५०% वरुन ५३% करण्यात आला आहे.

आपला डीए वाढ व फरक येथे पहा ➡️ DA Calculator 

सदर महागाई भत्ता वाढ दिनांक १ जुलै, २०२४ ते दिनांक ३१ जानेवारी, २०२५ या कालावधीतील थकबाकीसह माहे फेब्रुवारी, २०२५ च्या वेतनासोबत रोखीने देण्यात येणार आहे.

महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भातील विद्यमान तरतुदी व कार्यपध्दती आहे त्याचप्रकारे यापुढे लागू राहील. यावर होणारा खर्च संबंधित शासकीय कर्मचान्यांचे वेतन व भत्ते ज्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात येतात, त्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकून त्याखालील मंजूर अनुदानातून भागविण्यात येईल.

हे पण वाचा ~  8th Pay Commission HRA : कर्मचाऱ्यांसाठी HRA साठी आठव्या वेतन आयोगात सुध्दा असणार शहरांचे X,Y,Z वर्गीकरण? पहा घरभाडे भत्त्याची टक्केवारी ...

अनुदानप्राप्त संस्था व जिल्हा परिषद कर्ममवाऱ्यांच्या बाबतीत, संबंधित प्रमुख लेखाशीर्षांखालील ज्या उप लेखाशीर्षाखाली त्यांच्या सहाय्यक अनुदानाबाबतचा खर्च खर्ची टाकण्यात येतो, त्या उप लेखाशीर्षाखाली हा खर्च खर्ची टाकण्यात येईल.

 

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२५०२२५१५५३३५८४०५ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don't Copy!!