Dearness Allowance : केंद्र सरकारच्या कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वाढीव 4% महागाई भत्ता देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात घेतला होता. आता खालील संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ da hike करण्यात आली असून आता महागाई भत्ता 50 टक्क्यांवर गेला आहे.
महागाई भत्ता 4 % वाढला
संचालक, केंद्रीय वित्त व व्यय विभाग, (केंद्र सरकार), नवी दिल्ली यांनी क्र.१/१/२०२४-E.JI (B), दि.१२.०३.२०२४ ची प्रत महाराष्ट्र राज्यातील दुय्यम न्यायालयातील न्यायिक अधिकाऱ्यांसंदर्भात माहिती व योग्य त्या कार्यवाहीसाठी अग्रेषित.
केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाच्या उपरोक्त नमूद कार्यालयीन ज्ञापनानुसार दि.०१.०१.२०२४ पासून लागू करण्यात आलेली ४% (४६% ते ५०%) महागाई भत्त्यातील (Dearness Allowance) वाढ व ज्ञापनात नमूद इतर तरतूदी महाराष्ट्र राज्यातील दुय्यम न्यायालयातील कार्यरत न्यायिक अधिकाऱ्यांना तसेच सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना लागू राहतील
Deaeness Allowance hike
आता महाराष्ट्र राज्यातील दुय्यम न्यायालयातील कार्यरत न्यायिक अधिकाऱ्यांना तसेच सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना दि.०१.०१.२०२४ पासून ५०% दराने महागाई भत्ता अनुज्ञेय राहील. सदर महागाई भत्त्याच्या वाढीची रक्कम रोखीने अदा करण्यात येणार आहे.
सदरील शासन निर्णाप्रमाणे दि.०१.०१.२०२४ पासून ५० % दराने महागाई भत्ता अनुज्ञेय राहील.आता राज्य सरकारी कर्मचारी यांना कधी वाढ मिळते हे पाहणे उस्तुक्याचे ठरणार आहे.