Close Visit Mhshetkari

Dcps Amounts : सन २०२३-२४ या आर्थिक वर्षातील परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन संदर्भात महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित ….

Dcps Amounts : जिल्हा परिषदा, मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित प्राथमिक,माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील १००% अनुदानित पदावरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात आली होती.

NPS DCPS Amount Transfer

सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेंतर्गत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकरिता कर्मचारी हिस्सा व शासन हिस्सा यावरील व्याज अदा करण्यासाठी निधी वितरीत करण्याबाबत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

सदर योजनेसाठी शासनाचा हिस्सा व व्याजासाठी स्वतंत्र लेखाशीर्ष उघडण्यात आलेली आहे.शिक्षण सहसंचालक, (प्राथमिक), पुणे व शिक्षण उपसंचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), पुणे यांनी निधी उपलब्ध करुन देण्याबाबत विनंती केली आहे.

आता वित्त विभागाने सुधारित अंदाजाच्या मर्यादेत १०० टक्के तरतूद उपलब्ध करुन दिली आहे.परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेतंर्गत सन २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी खालीलप्रमाणे मंजूर अर्थसंकल्पीय तरतूद बीम्स प्रणालीवर वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

सदर खर्च वरील विवरणपत्रातील संबंधित लेखाशीर्षातून सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात अर्थसंकल्पीत करण्यात आलेल्या संबंधित लेखाशीर्षाच्या तरतूदीतून पुस्तकी समायोजनाद्वारे भागवावा, तसेच मंजूर अनुदानापेक्षा जास्त खर्च होणार नाही, याची दक्षता घ्यावी.

DCPS शासन हिस्सा व व्याज अदा अटी व शर्ती

मंजूर केलेली अनुदाने पुढील अटी व शर्तीच्या अधीन आहेत.

हे पण वाचा ~  Retirement Plan रिटायरमेंटनंतर पेन्शनचं टेन्शन दूर करतील या ५ स्कीम्स, घरबसल्या महिन्याला होईल कमाई; कोणत्या आहेत स्कीम्स?

(१) उपराज्य अभिलेख देखभाल अभिकरणांनी या अनुदानातून केलेल्या खर्चाचे DCPS चे स्वतंत्र लेखे ठेवावेत.

(२) ज्या उद्दिष्टासाठी सदर निधी मंजूर करण्यात आला आहे, त्याच उद्दिष्टासाठी खर्च करण्यात यावा

(३) वित्त विभागाने प्रत्येक वर्षी व्याजाचे दर निश्चित करणारे शासन निर्णय निर्गमित केले आहेत. तसेच व्याजाची परिगणना करताना वित्त विभाग परिपत्रक क्र. अंनियो १०१०/प्र.क्र.६७/सेवा-४, दिनांक १६ नोव्हेंबर, २०१२ नुसार कार्यवाही करण्याची दक्षता घ्यावी. त्यानुसारच विहित दराने व्याजाची आकारणी करण्यासंदर्भातील कार्यवाही उपराज्य अभिलेख देखभाल अभिकरणाने करुन नमुना ४५ अ मध्ये व्याजाची रक्कम आहरित करण्याकरिता निरंक रक्कमेचे देयक कोषागारात सादर करावे. 

(४) सममुल्य अंशदानाची रक्कम शासनास भरणा केल्याबद्दल नमुना क्र. आर ७ शिक्षण अधिकारी/शिक्षण निरिक्षक (प्राथमिक, माध्यमिक) मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांनी संबंधित कोषागाराकडून प्रमाणित करुन घ्यावी व त्या प्रमाणपत्राच्या प्रती उपराज्य अभिलेख देखभाल अभिकरणाकडे दरमहा पाठवाव्यात.

(५) जिल्हा परिषदा मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील १०० % अनुदानित पदावरील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे मासिक अंशदान व त्यावरील शासनाचे अंशदान, अशा एकत्रित रकमेवरील व्याज खालील लेखाशीर्षामध्ये प्रस्तूत मंजूर अनुदानातून BEAMS वर उपलब्ध करण्यात आलेल्या अनुदानातून पुस्तकी समायोजनाद्वारे भागवावा लागणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don't Copy!!