DA Hike : नमस्कार मित्रांनो, अनेक दिवसापासून सरकारी कर्मचाऱ्यांना 53% महागाई भत्ता वाढीची (Da hike update) प्रतीक्षा लागलेली असताना आता या संदर्भात मोठी बातमी समोर आलेली आहे.
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणारे महागाई भत्ता वाढीचे गिफ्ट आता लांबणीवर पडण्याची चिन्ह दिसत आहेत.तर काय आहे बातमी पाहूया सविस्तर …
DA Hike Letest Update
मित्रांनो प्रत्येक महिन्याच्या शेवटी सर्व विभागांना निधीचे वितरण करण्यात येते. त्यामध्ये राज्य सरकारी कर्मचारी त्याचबरोबर पेन्शन धारकांच्या निधीच्या सुद्धा समावेश असतो. या महिन्याच्या निधी वाटपामध्ये वाढीव डीए संदर्भात कोणती तरतूद केली नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे.आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्तासाठी वाट पाहावी लागणार आहे.
महाराष्ट्रात महिला व बाल विकास विभागाअंतर्गत राबवल्या जाणाऱ्या लाडक्या बहिण योजनेसाठी आवश्यक निधी वर्ग केल्यामुळे, इतर विभागाला निधीची कमतरता भासताना दिसत आहे. आता निधी शिल्लक न राहील्यामुळे राज्य सरकारी कर्मचारी व पेन्शन धारकांना अनेक दिवसांपासून देय असलेला DA hike आता पुन्हा लंबणीवर पडणार आहे.
राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव 3 % म्हणजे एकुण 53 % दराने महागाई भत्ता लागु करण्याचा निर्णय निधी अभावी पुढील महिन्यापर्यंत लांबणीवर पडणार आहे.
आता कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या महागाई भत्ता 07 महिन्याच्या थकबाकीसह वाढीसह माहे फेब्रुवारी महिन्यात मिळणार आहे.