DA Arrears update : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी डीए थकबाकी कधी मिळणार! पहा तारीख, फरक आणि सविस्तर माहिती …

DA Arrears update : केंद्र सरकारने 28 मार्च 2025 रोजी महागाई भत्ता (DA) आणि महागाई मदतीत (DR) 2% वाढ जाहीर केली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सदरील वाढ 1 जानेवारी 2025 पासून लागू होणार आहे, ज्यामुळे 1 कोटीहून अधिक कर्मचारी आणि निवृत्तांना फायदा होणार आहे.

DA Arrears New Update

DA वाढीची घोषणा उशिरा झाली आहे.सामान्यतः सरकार ही घोषणा होळी किंवा दिवाळीपूर्वी करते, पण यावेळी जानेवारी-जूनसाठीची वाढ मार्चच्या शेवटी जाहीर करण्यात आली.याचा अर्थ असा की एप्रिलच्या पगार आणि पेन्शनमध्ये वाढलेला DA समाविष्ट असेल आणि जानेवारी ते मार्च 2025 या तीन महिन्यांची थकबाकी एकरकमी दिली जाईल.

DA hike Chart

सरकारी कर्मचाऱ्यांना यावेळी फक्त 2% वाढ जाहीर झाली आहे, जी गेल्या 7 वर्षांतील सर्वात कमी आहे.

जुलै-डिसेंबर 2024 साठी DA 50% वरून 53% केला गेला होता.आता तो 55% होईल.

पगार आणि पेन्शनमध्ये किती वाढ होईल?

7व्या वेतन आयोगानुसार सरकारी कर्मचाऱ्यांचा किमान मूळ वेतन 18,000 असेल तर या 2 % वाढीमुळे दरमहा 360 रुपये अधिक मिळतील. त्यामुळे जानेवारी-मार्च 2025 साठी एकूण 1,080 थकबाकी मिळेल.

हे पण वाचा ~  State Employees : अतिशय महत्त्वाची अपडेट ! सरकारी कर्मचाऱ्यांच्या बडतर्फेवर विलंबना संदर्भात नवीन शासन निर्णय ...

निवृत्तांसाठी ज्या पेन्शनधारकांना किमान ₹9,000 पेन्शन मिळते,त्यांना 540 रुपये थकबाकी एप्रिल 2025 मध्ये मिळेल.

आठव्या वेतन आयोगानंतरचा पहिली DA वाढ

आठव्या वेतन आयोगाची घोषणा 16 जानेवारी 2025 रोजी करण्यात आली. याच्या शिफारशी 1 जानेवारी 2026 पासून लागू होतील.

सामान्यतः वेतन आयोगाच्या शिफारशी तयार होण्यासाठी 1 वर्षाचा कालावधी लागतो. त्यामुळे यंदाच्या दिवाळीच्या सुमारास जाहीर होणारी जुलै-डिसेंबर 2025 ची DA वाढ ही सातव्या वेतन आयोगातील शेवटची वाढ असणार आहे.

सध्या, वाढलेला DA आणि तीन महिन्यांची थकबाकी एप्रिलमध्ये मिळाल्यामुळे सरकारी कर्मचारी आणि निवृत्तांना दिलासा मिळणार आहे. आता सर्वांचे लक्ष 8th Pay Commission कडे आहे, कारण लवकरच सरकार या आयोगाच्या समितीच्या सदस्यांची घोषणा करू शकते.

जवळपास 15-18 महिन्यांत समिती आपला अहवाल सादर करेल, त्यानंतर केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या नवीन वेतन आणि पेन्शन वाढीबाबत निर्णय घेतला जाईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don't Copy!!