Credit Score : आजकाल क्रेडिट कार्ड,पर्सनल लोन आणि होम लोन सारख्या वित्तीय साधनांचा वापर वाढत आहे. पण या सर्वांचा थेट परिणाम आपल्या “क्रेडिट स्कोअर” वर होतो.
क्रेडिट स्कोअर हा आपल्या आर्थिक आरोग्याचा आरसा असतो. जर तो नकारात्मक असेल, तर बँका किंवा वित्तीय संस्था कर्ज देण्यास नकार देऊ शकतात. पण अनेक वेळा असे होते की, आपण हप्ते वेळेवर भरतो, तरीही क्रेडिट स्कोअर निगेटिव्ह का होतो? याची कारणे आज आपण जाणून घेणार आहोत.
What is Credit Score ?
क्रेडिट स्कोअर हा एक तीन-अंकी आकडा असतो, जो आपल्या कर्ज परतफेडीच्या इतिहासावर आधारित असतो. हा स्कोअर 300 ते 900 दरम्यान असतो. 750 पेक्षा जास्त स्कोअर चांगला मानला जातो. कमी स्कोअर असल्यास कर्ज मंजूर होण्याची शक्यता कमी होते.
हप्ते वेळेवर भरल्यानंतरही क्रेडिट स्कोअर निगेटिव्ह का होतो?
१) जर तुम्ही क्रेडिट कार्डची मर्यादा 80% पेक्षा जास्त वापरता, तर याचा वाईट परिणाम तुमच्या क्रेडिट स्कोअरवर होतो.
२) होम लोन, पर्सनल लोन, क्रेडिट कार्ड इत्यादी वेगवेगळ्या प्रकारची कर्जे असल्यास, त्यांची नियमित परतफेड करणे आवश्यक आहे.
3) जर तुम्ही वेगवेगळ्या बँकांकडून कर्जासाठी वारंवार चौकशी करता, तर प्रत्येक वेळी तुमचा क्रेडिट स्कोअर तपासला जातो. यामुळे स्कोअरवर नकारात्मक परिणाम होतो.
4) क्रेडिट कार्ड स्टेटमेंटमध्ये कोणतीही त्रुटी असल्यास, त्याचा वाईट परिणाम क्रेडिट स्कोअरवर होतो.
5) तुम्ही एखाद्यासाठी कर्जावर जामीनदार असाल आणि त्या व्यक्तीने कर्जाची परतफेड केली नाही, तर त्याचा वाईट परिणाम तुमच्या क्रेडिट स्कोअरवर होतो.
क्रेडिट स्कोअर सुधारण्यासाठी टिप्स
- हप्ते वेळेवर भरा : कोणताही हप्ता मिस होऊ द्या नका.
- क्रेडिट कार्डचा वापर : क्रेडिट कार्डची मर्यादा 30% पेक्षा कमी ठेवा.
- क्रेडिट रिपोर्ट तपासा : नियमितपणे क्रेडिट रिपोर्ट तपासा आणि त्रुटी असल्यास सुधारणा करा.
- कर्जांची चौकशी टाळा : एकाच वेळी एकाच बँकेत कर्जासाठी अर्ज करा.
क्रेडिट स्कोअर हा आपल्या आर्थिक आरोग्याचा महत्त्वाचा भाग आहे. हप्ते वेळेवर भरल्यानंतरही क्रेडिट स्कोअर निगेटिव्ह होण्याची कारणे समजून घेऊन, योग्य पावले उचलल्यास तुम्ही तुमचा क्रेडिट स्कोअर सुधारू शकता. चांगला क्रेडिट स्कोअर असल्यास, कर्ज मंजूर होण्याची शक्यता वाढते आणि व्याजदर कमी मिळतो.