Confidential Report : शासकीय अधिकारी/कर्मचारी यांचे गोपनीय अहवाल लिहिणे व जतन करणे याबाबत शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, दिनांक १नोव्हेंबर, २०११ नुसार एकत्रित सूचना निर्गमित केल्या आहेत.
दिनांक ७ फेब्रुवारी, २०१८ च्या शासन निर्णयान्वये “गट-अ आणि गट-ब (राजपत्रित)” संवर्गातील राज्य शासकीय अधिकाऱ्यांचे कार्यमूल्यमापन अहवाल सन २०१७-१८ या प्रतिवेदन वर्षापासून “महापार” या प्रणालीद्वारे ऑनलाईन लिहिण्यात यावेत अशा सूचना निर्गमित करण्यात आल्या होत्या.
कर्मचारी गोपनीय अहवाल (Confidential Report)
आस्थापना मंडळासमोर सादर करण्यात येणारे कार्यमूल्यमापन अहवाल हे बहुतांशी ऑफलाईन पध्दतीने नोंदविलेले असतात, असे शासनाच्या निदर्शनास आल्याने दिनांक २२ जानेवारी, २०२५ च्या शासन परिपत्रकान्वये कार्यमूल्यमापन अहवाल ऑनलाईन पध्दतीने नोंदविण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या.
परंतु, अद्यापी आस्थापना मंडळासमोर सादर करण्यात येणारे कार्यमूल्यमापन अहवाल हे ऑफलाईन पध्दतीनेच नोंदविल्याचे आढळून आल्याने कार्यमूल्यमापन अहवाल “महापार” या संगणक प्रणालीत नोंदविण्याबाबत सर्व आस्थापना अधिकारी/संस्करण अधिकारी यांना खालीलप्रमाणे सूचना देण्यात आहे.
आस्थापना मंडळापुढे प्रस्ताव सादर करतांना विचारक्षेत्रातील सर्व अधिकाऱ्यांचे कार्यमूल्यमापन अहवाल हे “महापार” प्रणालीमध्ये ऑनलाईन पध्दतीनेच नोंदविलेले असणे आवश्यक आहे. ऑफलाईन पध्दतीने नोंदविलेले कार्यमूल्यमापन अहवाल दि.०१ सप्टेंबर, २०२५ पासून आस्थापना मंडळाच्या बैठकीत विचारात घेतले जाणार नाहीत.
State Employees MAHAPAR
सन २०१७-१८ या प्रतिवेदन वर्षापासून गट-अ व गट-ब (राजपत्रित) संवर्गातील अधिका-यांचे कार्यमूल्यमापन अहवाल “महापार” या प्रणालीत लिहीण्यात यावे, अशा सूचना निर्गमित करण्यात आल्या होत्या. त्यामुळे, सन २०१७-२०१८ पासूनचे गट-अ व गट-ब (राजपत्रित) संवर्गातील अधिका-यांचे कार्यमूल्यमापन अहवाल ऑनलाईन पध्दतीत उपलब्ध होण्यास्तव, गट-अ व गट-ब (राजपत्रित) संवर्गातील अधिका-यांचे सन २०१७-१८ नंतरचे ऑफलाईन पध्दतीत नमूद केलेले कार्यमूल्यमापन अहवाल Scan करुन महापार प्रणालीवर अपलोड करण्यात यावेत.