CIBIL Score calculator : आपणास कोणते बँकेकडून किंवा वित्तीय संस्थेकडून कर्ज घेण्यासाठी आपल्याला सिबिल स्कोर ची आवश्यकता असते परंतु हा सिबिल स्कोर कमी का होतो आणि कमी झाला असल्यास तो कसा वाढवायचा ? यासंबंधी सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये बघणार आहोत.
Credit score free check online
भारतात 4 क्रेडिट ब्युरो या क्रेडिट स्कोरची माहिती देतातदेतात. Trans Union CIBIL,Equifax, Experian,CRIF High Mark या क्रेडिट संस्थांना आरबीआयच्या माध्यमातून नियंत्रित करण्यात येते.
सन 2005 मध्ये क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपनी रेग्युलेटिंग ऍक्ट अंतर्गत एन बी एफ सी ग्राहकाला ग्राहकाने घेतलेल्या किरकोळ कर्जाचा अहवाल ही क्रेडिट भरला देणे बंधनकारक करण्यात आले आहे.
What is good credit score
बँकेकडून किंवा वित्तीय संस्थेकडून कर्ज घेण्यासाठी त्याच बरोबर एखादे कर्ज दुसऱ्या बँकेत ट्रान्सफर करण्यासाठी आपला क्रेडिट स्कोर विचारात घेण्यात येतो आपण जर अनेक प्रकारच्या कर्जाची किंवा कर्जाच्या हप्त्याची परतफेड केली आहे किंवा नाही याची सविस्तर माहिती क्रेडिट हिस्टरी मध्ये मिळते.
आपला Credit Score हा 300 ते 900 पॉइंट्स दरम्यान असतो. जर 750 गुणांपेक्षा जास्त सिबिल असेल तर 79 % ग्राहकांना कर्ज दिले जाते.
How is the CIBIL score calculate?
loan and credit card use : – तुमच्या सध्याच्या कर्जाचे प्रमाण हे तुमच्या पगाराच्या तुलनेत जास्त नसावी याचा 30% परिणाम आपल्या क्रेडिट स्कोर वर होत असतो.
loan repayment :- आपला सिबिल स्कोर वाढवण्याचा सर्वात महत्त्वाचा आणि चांगला पर्याय म्हणजे आपण घेतलेले कर्ज हप्ते वेळेवर भरावेत आपला सिबिल स्कोर वाढण्यामध्ये आपण भरत असलेल्या कर्जांच्या हप्त्याचा पस्तीस टक्के परिणाम होत असतो.
Types and tenure of loan :- कोणत्याही ग्राहकांनी घेतलेल्या कर्जाचा प्रकार आणि त्याची परतफेड याचा त्याच्या क्रेडिट हिस्ट्री वरती परिणाम होतो साधारणपणे Credit रेटिंगवर याचा 10% परिणाम होतो.
Loan demand and inquiry :- आपल्याला कर्ज हवे असल्यास आपण काय करतो की कोणत्या बँकेमध्ये जातो, आणि वारंवार त्यांच्याकडे कर्जाची मागणी करतो.तेव्हा अशा वेळेस सिबिल स्कोर चेक करून कर्ज रक्कम टाकतात, कर्ज मिळाले नाही,तर आपली कर्जाची मागणीची संख्या वाढते. त्याचा परिणाम आपल्या क्रेडिट हिस्टोर होत असतो त्यामुळे कर्ज मागणी करताना काळजीपूर्वक करावी.