Cibil Score Tips : लोन मिळणे आणि न मिळणे या दोन्ही परिस्थितीत सिव्हिल स्कोरचा महत्त्वाचा वाटा असतो.सिव्हिल स्कोर कमी असल्यास आपल्याला लोन मिळवण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. चला, जाणून घेऊया Cibil Score वाढवण्याच्या त्या सात पद्धतींबद्दल,ज्यांचा अवलंब केल्याने आपला सिबील स्कोर 700 पार होण्यास मदत होणार आहे.
How to increase Cibil Score ?
लोन मिळवण्यासाठी क्रेडिट स्कोरचा महत्त्वपूर्ण वाटा असतो.सिव्हिल स्कोर कमी असल्यास ग्राहकाला लोन मिळवण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. RBI च्या मार्गदर्शनानुसार काही सोप्या पद्धतींचा अवलंब करून ग्राहक आपला क्रेडिट स्कोर सहजपणे वाढवू शकतात.सदरील पद्धतींचा अवलंब केल्याने आपल्या क्रेडिट स्कोरमध्ये लगेचच वाढ होईल.
कशा पद्धतींनी वाढतो सिबील स्कोअर ?
1. सर्व कर्ज आणि क्रेडिट कार्डचे बिल वेळेत भरा : ग्राहकाने सर्व कर्जे आणि क्रेडिट कार्डचे बिल वेळेत भरणे आवश्यक आहे. परतफेड उशीर झाल्यास क्रेडिट स्कोरवर नकारात्मक परिणाम होतो, ज्यामुळे भविष्यात अडचणी निर्माण होऊ शकतात.
2. क्रेडिट वापर कमी करा : ग्राहकाने क्रेडिट कार्डची मर्यादा केवळ ३०% किंवा त्यापेक्षा कमी वापरावी. यामुळे Cibil Score चांगले राहण्यास मदत होते.
3. जुने क्रेडिट कार्ड किंवा कर्ज बंद करू नका : ग्राहकाने जुने क्रेडिट कार्ड किंवा कर्ज बंद करू नये. दीर्घकालीन क्रेडिट इतिहासाचा सिव्हिल स्कोरवर सकारात्मक परिणाम होतो.
4. एकाच वेळी नवीन क्रेडिट कार्ड किंवा कर्ज घेऊ नका : एकाच वेळी अनेक नवीन क्रेडिट कार्ड किंवा कर्ज घेतल्यास क्रेडिट स्कोरवर नकारात्मक परिणाम होतो.
5. क्रेडिट रिपोर्ट नियमित तपासा : ग्राहकाने नियमितपणे आपली क्रेडिट रिपोर्ट तपासावी, जेणेकरून कोणतीही चूक सुधारता येईल.
6. विविध प्रकारच्या क्रेडिटचा वापर : वैयक्तिक कर्ज, होम लोन, आणि क्रेडिट कार्ड यांचा योग्य मिश्रण करून आपला स्कोर वाढवण्यास मदत होते.
7. क्रेडिट रिपोर्टमधील सूचनांचे पालन करा : जर आपल्या क्रेडिट रिपोर्टमध्ये कोणत्याही सूचना दिल्या असतील, तर ग्राहकाने त्यांचे पालन केले पाहिजे. याचा सिबिल स्कोरवर सकारात्मक परिणाम होतो.
मित्रांनो, आपण या पद्धतींचा अवलंब केल्यास आपला Cibil Score वाढवण्यास मदत होईल आणि लोन मिळवणे सोपे जाईल.